ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

दुहेरी हत्याकांडाने माहूर हादरले : कापूस वेचतांना गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता

New Bharat Times नेटवर्क

माहूर : तालुक्यातील पाचोंदा शिवारात गुरुवारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना दोन सख्ख्या जावांचा अज्ञात संशयित चोरट्यांनी अंगावरील दागिने काढून घेऊन गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे माहूर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृतांमध्ये अंतकलाबाई अशोक अडागळे वय ५५ व अनुसयाबाई साहेबराव अडागळे (वय ४५) राहणार पाचोंदा यांचा समावेश आहे. दोघीही गुरुवारी सकाळी आप आपल्या शेतात कापूस वेचण्याकरीता गेल्या होत्या दोघींचे शेत शेजारीच लागून आहे.

माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील अंतकलाबाई अशोक अडागळे वय ५५ व अनुसयाबाई साहेबराव अडागळे (वय ४५) दोन शेतकरी महिला शेतात कामासाठी गेल्या असताना सायंकाळ पर्यंत घरी परत आले नसल्याने घरच्या लोकांनी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान शेतात जाऊन बघितले तर दोन महिलांची गळा आवळून हत्या केल्याची घटना दिसून आली.

दोन्ही महिलांच्या अंगावरील सोन्याचे दांगीने ल़पास केले होते. अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला करून दोघींच्या गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी माहूरचे पोलिस निरीक्षक साहेबराव चोपडे यांनी आपल्या कर्मचारी सह भेट देऊन पाहणी केली. सदरच्या घटनेचा पंचनामा करुन. दोन्ही मृत महिलाचे शिव विच्छेदन करण्यासाठी माहूर ग्रामीण रुग्णालय आणलै.

सदर गुन्ह्यामुळे माहूर तालुका हादरला असून, स्थानिक नागरिकांमध्ये विशेषतः शेत शिवारात काम काम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परिसरात असा दुहेरी हत्येचा प्रकार प्रथमच समोर आल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. ही घटना लूटमारीशी संबंधित आहे की, कोणत्या वैयक्तिक वैमनस्यातून घडली याचा उलगडा तपासातून होईल असे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker