ताज्या बातम्यानांदेडबिलोली

शंकरनगर जवाहर नवोदय विद्यालयात पी.एम.श्री योजनेअंतर्ग विद्यार्थ्यांची कार्यशाळा संपन्न

मोरे मनोहर

किनाळा :- शंकरनगर तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील जवाहर नवोदय विद्यालयात पीएम श्री योजनेअंतर्गत भारतीय ज्ञानपद्धती यामध्ये वैदिक ज्ञानपद्धती वैदिक गणित या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड आकाशवाणीचे कार्यकारी अधिकारी श्रीमान संजीवन पारटकर हे उपस्थित होते.

या कार्यशाळेत वैदिक गणिताचे धडे भारतीय ज्ञानपद्धती यामध्ये वैदिक ज्ञानपद्धती वैदिक गणित या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून आकाशवाणीचे कार्यकारी अधिकारी श्रीमान संजीवन पारटकर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी वैदिक गणित या विषयावर बोलण्यासाठी प्रसाद वाघमारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वक्ता तसेच ऍस्ट्रॉनॉमि या विषयावर तज्ञ व्यक्ती यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. तत्त्वज्ञान या विषयावर श्रीमान सारंग स्वामी विद्यालयाचे सहशिक्षक पेडगावकर यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी अँकर कसे बनावे या विषयावर आकाशवाणीच्या तसेच महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध अशा अँकर श्रीमती सीमंतिनी कुंडीकर यांनी विद्यार्थ्यांना हसत मुखाने दिवसभर अँकर कसे बनावे या विषयावर माहिती दिली ही कार्यशाळा दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू होते. विद्यार्थ्यांना वैदिक गणित तसेच विविध करियर मार्गदर्शन घडविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन दर महिन्यात करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेचेआयोजन जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी विशेष परिश्रम घेऊन यशस्वी केले असून त्यांना शाळेचे प्राचार्य सुहास मांडले यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वात शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी कार्यशाळा ही खूप सुंदर झाली आणि अशीच कार्यशाळा आपल्या इथे व्हावी ही इच्छा अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker