शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी रामतीर्थ ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

मोरे मनोहर
किनाळा :- येथून जवळच असलेल्या शेळगाव गौरी तालुका नायगाव येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक जागेतील मुलांना खेळण्यासाठी असलेल्या उद्यानातील मुलांना खेळण्यासाठी असलेले लोखंडी साहित्य सुमारे 5 लाख रुपये किमतीचे बळजबरी कापून नेले असता सदरील घटनेचा जबाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने ग्रामसेवक केते यांना लाथा बुक्क्यांनी मारून जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी रामतीर्थ पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून दोघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शेळगाव गौरी येथील ग्रामपंचायतच्या सार्वजनिक जागेवर गेल्या अनेक वर्षापासून मुलांना खेळण्यासाठी असलेल्या उद्यानातील मुलांना खेळण्यासाठी असलेले लोखंडी खेळाचे साहित्य गावातील निळकंठ रमेश पाटील आणि किशोर रमेश पाटील रा.शेळगाव गौरी ता.नायगाव यांनी मुलांना खेळण्यासाठी असलेल्या उद्यानातील सुमारे 5 लाख रुपये किमतीचे साहित्य कापून नेले या प्रकरणी ग्रामसेवक धनराज शेषराव केते यांनी याप्रकरणी त्यांना जबाब विचारण्यासाठी गेले असता ग्रामसेवक केते यांना दोघांनी संगणमत करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
शेळगाव गौरी येथील ग्रामसेवक धनराज शेषराव केते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी शेळगाव गौरी तालुका नायगाव येथील निळकंठ रमेश पाटील, किशोर रमेश पाटील रा.शेळगाव गौरी ता.नायगाव यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुरन 377/2025कलम132/, 121(१)119(१)329(4)314, 296, 351(२)(3)126(2)3(5)2023 सहकलम ३, ४सावजनिक संपती प्रतिबंध अधिनियम 1984 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे हे करीत आहेत.



