रविकुमार रूमाले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

मोरे मनोहर
किनाळा :- संत ज्ञानेश्वर विद्यालय धुप्पा येथे सहशिक्षक असलेल्या सुगाव, ता.देगलुर येथील उत्तमराव रुमाले यांचा मुलगा रविकुमार रूमाले यांची ग्रामीण भागातून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने त्यांच्या या निवडिचे सर्वत्र स्वागत केले जात असून त्यांच्या पुढील कार्यास अनेकांनी शुभेच्छा दिले.
ग्रामीण भागात असलेल्या सुगाव तालुका देगलुर येथील रविकुमार रूमाले यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साधना हायस्कूल देगलूर येथे पुर्ण झाल्यानंतर बी.फार्मसी कराड, जिल्हा सातारा येथे झाल्यानंतर एमपी एससी ची तयारी इस्लामपूर जिल्हा सांगली येथे केले.
जिद्द, सात्यत, प्रामाणिकपणा या तीन गोष्टीच्या बळावर रविकुमार उत्तमराव रूमाले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असल्याने सामान्य कुटुंबातील एका आदर्श सहशिक्षकांच्या मुलांनी घेतलेल्या उंच गगन भरारी यशाचे संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर, शाळेचे प्राचार्य संजय पाटील शेळगावकर, गावातील नागरिकांनी रविकुमार उत्तमराव रुमाले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिले.
रविकुमार यांनी या यशाचे सर्व श्रेय आई, वडील, भाऊ आणि शिक्षक हणमंत डांगे सर आणि कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधनी इस्लामपूर, जिल्हा सांगली चे केंद्रसंचालक अजितकुमार पाटील सर यांना दिले.