ताज्या बातम्यानांदेडनायगांव

कै.बळवंतरावजी चव्हाण यांना मान्यवरांनी वाहिली आदरांजली

अंकुशकुमार देगावकर

नायगाव :- नायगाव प: पंचक्रोशीचे भाग्यविधाते तथा लोकनेते कै.बळवंतराव (अण्णा) अमृतराव पाटील चव्हाण यांच्या १७ व्या पुण्यस्मरणानिमित्त दि.७ ऑगस्ट रोजी नायगांव येथे पुष्पांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चव्हाण परिवाराच्या वतीने अण्णांच्या समाधीचे पुजन करून अभिवादन केले त्यानंतर राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

यामध्ये केशवराव पा.चव्हाण, नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव पा.चव्हाण, हणमंतराव पा.चव्हाण, सुधाकरराव पा.चव्हाण, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.आ.हाणमंतराव पाटील बेटमगरेकर, नांदेड उत्तर चे जिल्हा अध्यक्ष बि.आर कदम काका, मा.सभापती बळवंतराव पा. बेटमोगरेकर, माधवराव अप्पा बेळगे, मा‌.सभापती बाळासाहेब पा.रावनगावकर, आनंदराव पा.चव्हाण, श्रीनिवास पा.चव्हाण, धनंजय पा चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पा. चव्हाण, युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण, डॉ.विश्वास पा. चव्हाण, श्रीधर पा.चव्हाण, पंकज पा.चव्हाण, अजित पा.चव्हाण, संजय अप्पा बेळगे, युवक काँग्रेसचे जि.उपाध्यक्ष प्रा.अखिल येवतीकर, विठ्ठल पाटील पावडे, प्रल्हाद पा. ईज्जतगावकर, बालासाहेब हातनीकर, शिवाजी पा.पाचपिपळीकर.

प्रा.बाबासाहेब पा.शिंदे, रविंद्र भालेराव, बालाजी भालेराव, शरद भालेराव, दत्ता मामा येवते, शिवाजी पा. बेटमोगरेकर, शिवाजी पा. कल्याण, पांडुरंग पा. चव्हाण, रमेश पा. शिंदे, संजय पा. चव्हाण, बालाजी शिंदे, विठ्ठल बेळगे, साईनाथ चन्नावार, माणिक पा. चव्हाण, NSUI अध्यक्ष सुरज पाटील, बंडू पाटील भोसले, हनमंत जाधव, मानसिंग पा. ताटे, पुल्लाजी पा.शिंदे, निलेश पा.बाळापुरकर, नरेंद्र रेड्डी, मत्तीन सेठ, विठ्ठल कोंडवाडे, साईनाथ हिवराळे, माधव मोरे, बोडले मामा यासह आदी जनांनी आदरांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker