ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

आंदोलकाच्या कंबरड्या’त फिल्मी स्टाईल लाथ घालणाऱ्या अधिकाऱ्याला पाठबळ कुणाचे ?

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी जालन्यात आल्या असता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले महिनाभर शांततेत उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याही पेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांना नेत असताना अनंत कुलकर्णी नामक डीवायएसपी असलेल्या अधिकाऱ्याने अगदी “फिल्मी स्टाईल” उंच उडी मारून आंदोलनकर्त्याच्या “कंबरड्यात लाथ” मारली.ह्या ब्रिटिश राजवटीपेक्षाही भयानक जुलमी पोलिसी अत्याचाराचा हा व्हिडिओ केवळ जालना पोलिसांच्या सत्तेचा जुलूम दाखवत नसून राज्यात पोलिसी अत्याचाराने लोकशाहीचा “गळा घोटणे” कसे सुरू आहे याचे चिंताजनक उदाहरण आहे.

पालकमंत्र्यांना भेटू द्या, या आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या एका व्यक्तीला डीवायएसपी असलेल्या अधिकाऱ्यांने त्याच्या कंबरेत लाथ मारल्याचा व्हिडिओ संपूर्ण राज्यात चांगलाच व्हायरल होत आहे. ऍक्शन चित्रपटात ज्याप्रकारे पोलीस गुंडांना मारतात त्याचप्रमाणे डीवायएसपी अनंत कुलकर्णीने आधीच धरून नेत असलेल्या आंदोलकांच्या पाठीमागून फिल्मी स्टाईलने उंच उडी घेत लाथ मारली. या व्हायरल व्हिडिओवर सर्वत्र सोशल मीडियात पोलिसांच्या वर्तनावर सडकून टिका होत आहे. गोपाळ चौधरी नावाची व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला होता.

त्याच्या तक्रारीनुसार त्याच्या पत्नीने पळून जाऊन परपुरुषासोबत लग्न केले आहे. मात्र तक्रार देऊन सुद्धा संबंधित आरोपीवर पोलिसांनी पैसे खाल्ल्यामुळे कारवाई न झाल्याचा त्याचा आरोप आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंत्री पंकजा मुंडे येत असल्याने आपल्याला त्यांना भेटू द्या अन्यथा आत्मदहन करू असा इशारा आंदोलकांने दिला होता. तर दुसरीकडे आंदोलकांनेच महिला पोलिसांच्या अंगावरही रॉकेल टाकण्याचा प्रयत्न केल्याने आम्हाला बळाचा वापर करावा लागला असे लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांने स्पष्टीकरण दिले आहे. तर ह्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी सगळीकडून मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker