दादांच्या पावलावरच राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणार – डॉ.मिनलताई पाटील

मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड जिल्ह्याचे तिन वेळा खासदार आणि तिन वेळा आमदार व एक वेळ मंत्री म्हणून राजकिय क्षेत्रात काम करताना भास्कररावजी पाटील खतगावकर दादांनी सर्व सामान्य घटकातील जनतेला न्याय देताना कधीच दुजाभाव न करता सर्व समाजातील घटकांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत दादांनी जे प्रयत्न केले त्याच प्रमाणे त्यांच्याच प्रेरणेतून मी देखील दादांच्या पावलावरच राजकीय व सामाजिक क्षेत्रात सामान्य जनतेच्या विश्वासावर काम करणार असे मत नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असलेल्या भावी आमदार डॉ.मीनलताई पाटील खतगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉ.मीनलताई पाटील खतगांवकर नायगाव विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करीत असून त्या अनुषंगाने दि.१२ ऑगस्ट रोजी सोमवारी तालुक्यातील गंगनबीडच्या महादेव मंदिरात कीर्तन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन केले होते त्यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमांचे आयोजक डॉ.मिनलताई पाटील खतगावकर बोलत होत्या.
यावेळी माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी पिय बालाजी पाटील खतगावकर,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉ मिनलताई पाटील खतगावकर, उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, प्रसिद्ध किर्तनकार रुपालीताई सवने परतुरकर, गुरुवर्य यदुबंन महाराज कोलंबिकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, रवि पाटील खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे.
माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सुविध्य पत्नी प्रतिभाताई चिखलीकर, शिवाजी महाराज देशमुख, आनंदराव बिरादार, गणपतराव पाटील धुप्पेकर, रंजित पा कुरे, संभाजी पा शिंदे, सचिन पाटील टाकळीकर, सरपंच गोविंदराव पाटील डाकोरे, रावसाहेब पाटील मोरे, चेअरमन सदाशिवराव पाटील डाकोरे, संतोष पा पुय्यड, यादवराव पाटील भेलोंडे, किशनराव पाटील देगावकर, धनराज शिरोळे, पोलिस पाटील इब्राहिम बेग पठाण, सोनाली हंबर्डे सह नायगाव तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, महिला व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरातन कालीन शिंगणापूर महादेव प्रतिरुप असलेल्या गंगनबीड महादेव मंदिरात खतगावकर कुटुंबीयांनी महापुजा केल्यानंतर जिलेबी व लाडुचा महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी पंधरा हजारांच्या वर भाविक भक्तांनी लाभ घेतला. मंदिर कमिटीचे गंगाधर पा मोरे, रावसाहेब पाटील मोरे व मंदीराचे पुजारांच्या हस्ते खतगावकर कुटुंबाचे स्वागत करून डॉ.मिनल पाटील खतगावकर यांना भावी आमदार म्हणून आशीर्वाद दिले.
यावेळी डॉ मिनलताई पाटील खतगावकर मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते
यावेळी अनेकांनी स्वयपूर्तीने रक्तदान केले.ह.भ.प. रूपालीताई सवणे यांच्या किर्तनाने अनेक भाविक मंत्रमुग्ध झाले असता आपण आपल्या कार्यात प्रामाणिकपणे कार्य केले तर जीवनात कधीच अपयश येणार नाही असे मत रुपालीताई सवने यांनी कीर्तनात सांगताना गरजवंतांना मदत करा यातच आपले पुन्य आहे असे सांगितले.
खतगावकर कुटुंबाचे स्तुत्य उपक्रम – रुपालीताई सवने
माजी मंत्री तथा माजी खा भास्कररावजी पाटील खतगावकर दादांनी सर्व सामान्य घटकातील जनतेला न्याय देताना कधीच दुजाभाव न करता सर्व समाजातील घटकांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत दादांनी जे समाज व धार्मिक कार्य करीत आहेत त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार रुपालीताई सवने यांनी आपल्या अमृतवाणीतुन व्यक्त केले.