ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी शहरातील खासगी दवाखाने २४ तासांसाठी बंद ◆कोलकाता घटनेचा डॉक्टर संघटनेकडून निषेध

◆मेडिकलचे अर्धे शटर उघडून घटनेचा मेडिकल दुकानदारांकडून निषेध

कुंडलवाडी प्रतिनिधी:- कोलकाता येथे आर.जी.कार मेडिकल कॉलेजमध्ये एका पदव्युत्तर पदवीधर तरुणीवर अत्याचार करून तिचा क्रूरपणे खून करण्यात आला.

या घटनेनंतर देशभरात वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यात पुन्हा त्याच ठिकाणी जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही हल्ला केला. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ शनिवारपासून पुढील २४ तास बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्याचा निर्णय कुंडलवाडी शहरातील डॉक्टर्स असोसिएशनने घेतला आहे. त्यानुसार आज शनिवार सकाळपासूनच शहरातील सर्वच खाजगी दवाखाने कडकडीत बंद आहेत.

कोलकाता येथील घटनेमुळे डॉक्टर्स कामाच्या ठिकाणीच सुरक्षित नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आयएमएच्या वतीने देशभरात कँडल मार्च, निदर्शने करण्यात आली. परंतु, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

न्यायालयानेही तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यात १५ ऑगस्ट रोजी मोठ्या जमावाने रुग्णालयाच्या विविध विभागांची तोडफोड केली. ज्या ठिकाणी अत्याचार आणि खुनाची घटना घडली, तेथील पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांवरही हल्ला करण्यात आला. याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने १७ ऑगस्टला देशव्यापी बंदची हाक दिली आहे.त्यानुसार कुंडलवाडी शहरात शनिवारी पुढील २४ तास ओपीडी बंद ठेवण्यात येणार आहेत.

◆ मेडिकलचे अर्धे शटर उघडून घटनेचा कुंडलवाडी शहरातील मेडिकल दुकानदारांनी निषेध नोंदवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker