ताज्या बातम्यानांदेडनायगांव

अवैध रित्या मुरूम वाहतूक करणारा टिप्पर तहसीलदारनी पकडला

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : मागील काही दिवसापासून काही माफीया मुरुमाची अवैध वाहतूक करत असल्याच्या माहीतीवरुन नरसी येथे दि. १६ रोजी चोरीच्या मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवा क्रमांक एम एच २४/एबी ९९२७ पकडून नायगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आला. नरसी येथील मुरुम माफीयाच्या तहसीलदारांनी मुसक्या आवळल्या असल्याने चपराक बसली आहे.

मागील काही दिवसापासून नरसी परिसरात चोरीच्या मुरुमाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड मंडळ अधिकारी आर.के.पवार तलाठी बा.डाकेवाड यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी सोमवारी दि.१६ रोजी नरसी परिसरात शोध मोहीम राबवली यात रात्री ८ वाजताच्या दरम्यान देगलूर रस्त्यावरुन नरसीकडे एम एच २४/एबी ९९२७ या क्रमांकाचा एक हायवा येतांना दिसला.

चौकशी करण्यासाठी त्या हायवाला थांबवण्यात आलो असता चालक हायवा रोडवरच सोडून पळ काढला. थोड्या वेळाने हायवाचा मालक तेथे आला आणि माझ्याकडे पावत्या असल्याचे दाखवत होता पण त्या पावत्या आठ तास अगोदरच्या तर होत्याच पण त्याची सत्यता तपासण्यात आल्यामुळे त्यावर शेरा मारलेला होता.

हायवा पोलीस ठाण्यात लावण्याबाबत तहसीलदाराशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी सरळ रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारास जाग्यावर बोलावून घेतले. त्यानंतर सदरचा हायवा नायगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आला. पकडलेल्या हायवावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker