ताज्या बातम्यानांदेडबिलोली

मुतन्याळ येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

मोरे मनोहर

किनाळा :- घरातील कोणीही व्यक्ती घरात नसताना मुतन्याळ तालुका बिलोली येथील 40 वर्षीय तरुण युवकाने स्वतःच्या घरातील तुळईला वायरमे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.पाच मार्च रोजी सकाळी उघडकीस आली असून त्यांच्या या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नसुन त्यांचे खतगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवाविच्छेदन करून सायंकाळी उशिरा मुतन्याळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अधिक माहिती अशी की मुतन्याळ तालुका बिलोली येथील शेख चांद मोहीदिन वय वर्षे 40 या तरुण युवकाने घरातील पत्नी आणि मुलं हे बाहेरगावी गेले असता दिनांक 5 मार्च रोजी शेख चांद मोहिदिन यांनी घरातील लाकडी तुळईला लाईटच्या वायरने गळफास घेऊन आपले जीवन संपवले असल्याचे दिसून आले.

सदरील घटना घडल्याचे समजतात रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून त्यांचे खतगाव येथील शासकीय रुग्णालयात शिवछेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले असता त्यांचा मुतन्याळ येथे शोकाकुल वातावरणात सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे गावभर शोककळा पसरली असून त्यांच्या या मृत्यूचे नेमके काय कारण होते हे कळु शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker