महामंडळ आणि खाजगी बसचा अपघात 27 जखमी : देगलूर तालुक्यातील बागण टाकळी येथील घटना

New Bharat Times नेटवर्क
देगलूर : तालुक्यातील बागणटाटळी येथील वाकानावर महामंडळ आणि खाजगी बसचा समोरासमोर अपघात झाला यात 27 प्रवाशी जखमी झाल्याची घटना सोमि सायंकाळी 5.15 वाजताच्या दरम्यान घडली. अपघात स्थळी बराच वेळ पोलीस यंत्रणा आली नसल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता. त्यामुळे वाहणधारक व नागरिकांनी तिव्र संताप व्यक्त केला.
हवामान खात्याने पावसाच्या इशारा दिला होता त्या अंदाजानुसार सायंकाळी पावसाला सुरुवात झालेली असतांनाच दि. 20 रोजी सोमवारी 5.15 वाजताच्या दरम्यान देगलूर पासून एक ते दिड किलोमीटर अंतरावर देगलूर व बागण टाकळीच्या वाकानावर महामंडळाची बस (क्रमांक एम एच 14 बी टी 1427) आणि खाजगी बस (क्र. एम एच 14 /बीए 9350) यांचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसमधील जवळपास 27 प्रवासी जखमी झाले होते. या सर्वांना अगोदर देगलूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी अनेकांना गंभीर दुखापत तर 8 रुग्नांना फक्चर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पाऊस सुरू असल्याने अपघाताच्या अर्ध्या तासानंतर देगलूर पोलीस यंत्रणा अपघातस्थळी आली नाही. त्यामुळे दोन्ही बाजूनी वाहणांच्या रांगा लागल्या होत्या परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा फटका आ. जितेश अंतापूरकर यांनाही बसला. अर्ध्यातासानंतर देगलूर पोलीस यंत्रणा अपघातस्थळी आली तोपर्यंत वाहण धारट व प्रवास करणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहण करावा लागला. पोलीस यंत्रणा वेळेत घटनास्थळी आली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.



