तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत के.एम. पाटील माध्यमिक विद्यालयाचा प्रथम क्रमांक
◆जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड

कुंडलवाडी :- तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत पाटोदा ( बु) येथील के.एम.पाटील माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शाळा पात्र ठरली आहे.
धर्माबाद येथील क्रीडा संकुल येथे गत दोन दिवसांपासून तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेस सुरुवात झाली आहे.दि.११ सप्टेंबर रोजी १४ वर्षाखालील मुलींच्या शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा पार पडल्या. अंतिम सामन्यात पाटोदा ( बु.) येथील के.एम. पाटील माध्यमिक विद्यालय व हुतात्मा पानसरे शाळेत सामना झाला. यात के.एम.पाटील माध्यमिक विद्यालयाने हुतात्मा पानसरे हायस्कूल शाळेवर मात करीत तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
के.एम पाटील माध्यमिक विद्यालयाकडून खो-खो स्पर्धेसाठी कप्तान वैष्णवी कदम, दिव्या आवरे, अनुष्का वानखेडे, मुक्ता कदम, प्राची शिंदे, माया इमनेलू, पुनम मँकललाड, स्नेहा वानखेडे वेदिका शिंदे आराध्या नरवाडे मोहिनी ढेले, या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक टी.आर.भारसावडे यांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनायकराव किशनराव पाटील शिंदे, सचिव जी.एल.पवार व सर्व सन्माननीय संचालक मंडळ, गटशिक्षणाधिकारी रविशंकर मरकंटे, रत्नाळी केंद्राचे केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय योगीराज शिंदे, सहशिक्षक बी.यु.नरवाडे, टी.आर.भारसावडे, एस.व्ही.रामपुरकर, डी.आर.गबाळे, एस.डी.नरवाडे, आर.एल.हंबर्डे, उदय पाटील पवार, कुणाल पवारे, व्हि.जी.पपुलवाड, व्हि.व्हि.गट्टुवार, जी.एम.जालनेकर, साहेबराव कवळे, एम.बी.शेख यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आहे.



