ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या नांदेड जिल्हाध्यपदी प्रा.परशुराम येसलवाड

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी प्रा.परशुराम येसलवाड यांची निवड करण्यात आली आहे. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रा.येसलवाड यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. मुंबई विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे सर्वेसर्वा प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर साहेब यांच्या हस्ते प्रा.येसलवाड यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांतउपाध्यक्ष विठूभाऊ चव्हाण, प्रांतसरचिटणीस मा.रमेशजी चौगुले, मराठवाडा विभागीय अध्यक्ष नामदेवरावजी सोनवणे, मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे, मराठवाडा समन्वयक श्री माणिकराव सेलुकर, छत्रपती संभाजीनगर महानगराध्यक्ष दत्ताजी पवार, लातूर जिल्हाध्यक्ष शरद हुडगे, रमाकांत गरड, नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, तानाजी पवार, जिल्हासरचिटणीस मा.रवी बंडेवार , गंगाधर कदम,मा.गंगाधर करेवार, हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन मुळे, कैलास हाराळ व बहुसंख्य शिक्षक सैनिक उपस्थित होते.

प्रा.परशुराम येसलवाड यांच्या निवडीबद्दल नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी व हिंगोली जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker