ताज्या बातम्यानांदेडबिलोली

रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान

मोरे मनोहर

किनाळा :– नादेंड जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी जुन महिन्यात 92 गुन्हायाची मुदतीत निर्मिती केल्यामुळे त्यांचा 20 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता भयभीत झाली होती परंतु रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम हराळे यांनी दोन महिन्यापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर मागील अनेक महिन्यापासून हद्दीतील अनेक झालेल्या चोऱ्यांचा तपास लागत नव्हता मात्र दोनच महिन्यात विक्रम हराळे यांनी 92 गुन्हाचा तपास मुदतित निर्मिती करून कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हे कमी होण्यासाठी मदत केले.

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोल्हे बोरगाव येथे एकाच दिवशी चार घर पुण्यात करून चोरांनी पळून जाण्यात यशस्वी झाले होते यामुळे शंकरनगर परिसरातील जनता भयभीत झालेली असताना या घटनेतील मुख्य सूत्रधार असणारे आरोपी पकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात रामतीर्थ पोलिसांना यश आल्याने त्यांच्या या कार्यामुळे सामान्य जनतेत नवचैतन्य पसरले असून चोरांच्या मुसक्या आवळल्याने त्यांच्या या धाडसी कार्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकाकडून रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

अवघ्या दोन महिन्यात रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सूत्र स्वीकारून विक्रम हराळे यांनी अनेक घडलेली गुन्हे उघड करण्यात यशस्वी झाले असताना किनाळा तालुका बिलोली येथील एका बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तरुणाचा मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून शोध घेऊनतरुनाचा जिव वाचवले यामुळे त्यांच्या या कार्याचे सामान्य जनतेतूनही कौतुक केले जात असताना त्यांच्या या कार्याची नोंद जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेऊन त्यांचा विशेष सन्मान केल्याने रामचंद्र पोलिसांच्या कार्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांचे बळ मिळाले यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच सपने विक्रम हराळे यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांगले कार्य होईल असा आशावाद अनेकांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker