ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

मसाप शाखा नांदेडच्या तिसऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : मराठवाडा साहित्य परिषदे नांदेड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लोहा येथील डी. के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

संमेलनाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मसाप शाखा नांदेडच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर यांच्या नावाची निवड करण्यात आली. निवडीनंतर मसाप शाखा नांदेडच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारी सदस्य आणि ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी मसाप नांदेड शाखेचे अध्यक्ष बालाजी इबितदार होते. कार्यवाह प्रा. महेश मोरे यांच्यासह दिगंबर कदम, श्रीनिवास मस्के, राम तरटे, प्रा. डॉ. संजय जगताप, प्रा. धाराशिव शिराळे, निजाम गवंडगावकर , प्रा. ललिता बोकारे, अनुजा डोईफोडे, ॲड विजयकुमार भोपी, बालाजी भागानगरे, मंगला फुलारी आदींची उपस्थिती होती.

या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिकांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असून, विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणी सदस्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!