ताज्या बातम्यानांदेडनायगांव

धनराज शिरोळे यांची भाजप किसान मोर्चाच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड

प्रकाश महिपाळे

नायगाव: भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण ग्रामीणच्या किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी धनराज पिराजीराव शिरोळे (रा.नायगाव बाजार) यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव मारोतराव हंबर्डे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून या निवडीची घोषणा केली.

संघटन आणि सामाजिक कार्याची दखल…
तरुण, तडफदार बहुजन नेतृत्व आणि उत्कृष्ट शेतकरी अशी ओळख असलेले धनराज शिरोळे यांनी यापूर्वी पक्षात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांनी भाजमध्ये युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, नायगाव तालुकाध्यक्ष तसेच किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. गावपातळीवरील मजबूत संघटन, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा नेता आणि सर्वांच्या हाकेला धावून जाणारा माणूस म्हणून त्यांची परिसरात खास ओळख आहे.

राजकीय व सामाजिक प्रवास…
सामान्य कुटुंबातील बहुजन नेतृत्व म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या काळात तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर आणि माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राम पाटील राटोलीकर यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन नायगाव तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपवली.

तालुकाध्यक्ष असताना शिरोळे यांनी गावपातळीवरील अनेक कार्यकर्त्यांना प्रशासकीय अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली. तसेच ग्रामविकास, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास अशा विविध विभागांचा भरीव निधी तालुक्यात आणून विकासाला गती दिली. विविध शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून उपक्षितांना न्याय देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही जिल्ह्यातील एक उत्कृष्ट तालुकाध्यक्ष म्हणून त्यांचा गौरव केला आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यास प्राधान्य…
किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धनराज शिरोळे यांनी भाजप पक्षश्रेष्ठी आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. शेतकरी बांधवांचे प्रश्न व अडचणी शासनदरबारी मांडून ते सोडवण्यासाठी आणि सरकारच्या कल्याणकारी योजना अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्य करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!