ताज्या बातम्यानांदेडबिलोली

आमदार जितेश अंतापुरकर पिक पहाणीसाठी पोहोचले किनाळा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर

मोरे मनोहर

किनाळा :- शंकरनगर परिसरात तब्बल एक महिन्यापासून पावसाचा बेपत्ता असल्याने हाती येणारे शेतकऱ्यांच्या शेतातील मोठ्या प्रमाणात असलेली सोयाबीन व इतर अनेक पिके पावसाअभावी सुकून जात असल्याने देशाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजावर निसर्ग कोपल्याने शेतकरी राजावर ओढावलेल्या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ शेतातील पिकांचे पंचनामे करून कोरडा दुष्काळ जाहीर करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात असताना देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर हे थेट किनाळा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केले.

किनाळा परिसरात नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली पिकाची उगवण चांगली झाली मात्र अख्खा ऑगस्ट महिना एकही पाऊस न पडल्याने एक महिन्यापासून कसेबसे वाढलेली सोयाबीनची पिके ऐन फुलाच्या मोसमात पावसाअभावी होरपळून जात असल्याने शेतकरी राजा आज पर्यंत पाऊस पडेल या आशेवर असलेला शेतकरी पावसाने अक्का एक महिन्यापासून दडी मारल्याने शेतातील पीक हातचे जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा शेतीची मशागत करून निसर्गाच्या भरोशावर सावकारी कर्ज काढून शेतात महागामोलीचे बी बियाणे व रासायनिक खते टाकून रात्रंदिवस शेतीची मशागत करून शेतकऱ्यांच्या नशीबी कधी अतिवृष्टी होऊन तर कधी अतिअल्प पावसाने शेतातील पिके वाया जाउन शेतकऱ्यांच्या नशीबी यंदाही तब्बल एक महिन्यापासून पावसाने जडी मारल्याने शेतकऱ्यांच्या शेतात असणारे सोयाबीन व इतर अनेक पिके पावसाअभावी पूर्णपणे वाळून जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे.

देशाचा पोशिंदा म्हणून आजही बळीराजाकडे पाहिले जाते मात्र देशाचा पोशिंदा असलेला शेतकरीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील पूर्णपणे पिकेही पावसाअभावी वाळून जात असल्याने शेतकरी दुबार आर्थिक संकटात आला असून शेतकऱ्यांना अशा ह्या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे तात्काळ सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केल्या जात असल्याने याची नोंद घ्यावी.

दि.6 सप्टेंबर रोजी बिलोली देगलूर विधानसभेचे विद्यमान आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी किनाळा तालुका बिलोली येथील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतातील पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे यासाठी मी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन अशी शेतकऱ्यांना ग्वाही देत शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ सर्वे करण्यात यावे असे आदेश बिलोली तहसीलच्या कर्मचाऱ्यांना दिले.

यावेळी गावातील सरपंच विठ्ठल आनंदराव माने, उपसरपंच बालाजी व्यंकटराव पाटील भोसले, राजेश गंगाधरराव पाटील भोसले पोलीसपाटील, तिरुपती पाटील डाकोरे सरपंच हिप्परगा माळ, मारुती गंगाधर राहिरे भाजपा तालुकाध्यक्ष, ब्रह्मानंद कांबळे तालुका युवा अध्यक्ष भाजपा, किशनराव पाटील भोसले, पुंडलिकराव पाटील भोसले, व्यंकटराव पाटील शेळगावे, प्रतापराव पाटील शेळगावे, योगेश पाटील भोसले चेअरमन, प्रतापराव मोहिते, एकनाथ वडमिले, सलीम सय्यद, हुसेन मामा, श्रावण गायकवाड, बळीराम गायकवाड, अशोक सोंडारे, नायब तहसीलदार मॅडम बिलोली, मंडळ अधिकारी मुंडकर मॅडम, ग्राम महसूल अधिकारी घोंगडे साहेब, ग्रामविकास अधिकारी भायेगावे साहेब व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!