गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

शिक्षक अन मुख्याद्यापकाच्या वादात जि.प.शाळा कुलूपबंद ; नायगाव तालुक्यातील बरबडावाडीतील प्रकार

दोन शिक्षक, तीन विद्यार्थी ; तरीही शाळेला कुलूप! शिक्षकांच्या बेजबाबदार पणामुळे विध्यार्थ्यांचे नुकसान

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव तालुक्यातील बरबडा वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून शाळेत दोन शिक्षक आणि अवघे तीन विद्यार्थी असताना शाळेच्या इमारतीला कुलूप असल्याचे निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नायगाव तालुक्यातील बरबडा वाडी येथील शिक्षक व मुख्याध्यापक हे एक सप्टेंबर रोजी शाळेत आले होते मात्र शिक्षकाची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी दुपारून शाळेत उपस्थित राहत नसल्याचे सांगत मुख्याध्यापकाकडे रजा दिली व त्यानंतर संबंधित शिक्षक हे दवाखान्यात गेले असल्याचे शिक्षक मानकरी यांनी सांगितले. शिक्षक मानकरी हे 2 सप्टेंबर रोजी रजा देण्यासाठी शाळेवर गेले असता त्यांना मुख्याध्यपकाची भेट झाली नसल्याचे सांगितले त्यामुळे त्यांनी केंद्रप्रमुखकडे तेथेही कुणी भेटले नसल्यामुळे ते पंचायत समितीला जाऊन मेडिकल रजा दिल्याचे सांगितले.

तर मुख्यद्यापक यांनी सांगितले की मला कुठलीही रजा शिक्षकांनी दिली नाही मला शिक्षणाधिकारी मा.नांदेड यांनी विध्यार्थी विज्ञान मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आदेश आल्याने मी 1 सप्टेंबर रोजी शाळेतून साडे अकरा वाजता नांदेडला हजर राहण्यासाठी गेलो. 2 सप्टेंबर रोजी विज्ञान मेळाव्याचा कार्यक्रम असल्याने नांदेड येथे होतो तर त्यांचे काम पूर्ण झाले नसल्याने 3 सप्टेंबर रोजी पण काम केले. त्यानंतर शिक्षण अधिकारी यांचा फोन आल्याने दुपारी शाळेवर हजर झाल्याचे सांगितले.

शिक्षक व मुख्याद्यापकाच्या यांच्या दोघांच्या वादात 1 सप्टेंबर रोजी शाळा दिवसभर उघडी होती. रात्री अकरा च्या सुमारास शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षानी शाळा बंद केली असल्याचे शिक्षक मानकरी यांनी सांगितले. यां संदर्भात केंद्रप्रमुख पंडित ढगे यांना विचारले असता ते सुट्टीवर असल्याचे सांगितले. 2 सप्टेंबर रोजी शिक्षक मानकरी हे मेडिकल रजा देण्यासाठी पंचायत समितीला गेले व मुख्यद्यापक नांदेड ला विध्यार्थी विज्ञान मेळाव्याला गेले असल्याने शाळा दिवसभर कुलूपबंद राहिली.

यां संदर्भात प्रभारी गटशिक्षण अधिकारी सतीश दर्शनवाड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सदरील विषयां संदर्भात चौकशीचे पत्र काढले असून त्रीसदस्यीय समिती स्थापन केली आहे. यात विस्तार अधिकारी ढगे, केंद्रप्रमुख निरदुडे, हंगरगे यांचा समावेश आहे. ही समिती एक दोन दिवसात चौकशी करणार आहे त्यानंतरच कोण दोषी आहे ते कळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!