गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ शंकरनगर कडकडीत बंद

मोरे मनोहर

किनाळा :- मराठा समाजाला कुणबी संबोधून ओबीसीचे दाखले देण्यात यावेत या व इतर मागण्यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दिनांक 3 सप्टेंबर रोजी शंकर नगर तालुका बिलोली येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने येथील व्यापार पेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला यामुळे शालेय विद्यार्था बरोबरच प्रवाशांची खाण्यापिण्याची व पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय झाली होती.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा बुधवारी पाचवा दिवस होता त्यांची प्रकृती खालावलेली असतानाही ते आपल्या मागण्यावर ठाम असल्याने त्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी शंकरनगर तालुका बिलोली येथील 3 सप्टेंबर रोजी दिवसभर सर्व व्यापार पेठ बंद ठेवून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.

शंकरनगर येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला येथील किराणा दुकान, कापड दुकान, हॉटेल्स, पानपट्टी, हेअर कटिंग सलून चे दुकाने, भाजीपाला दुकाने, फ्रुट मार्केट आधीसह अन्य अनेक व्यवसाय करणारे व्यावसायिक आपली दुकाने स्वयंपूर्णतपने सकाळपासूनच दिवसभर बंद ठेवून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला असता शंकर नगर येथे असलेल्या पहिली पासून ते पदवीपर्यंतच्या विविध शाळेतील बाहेर जाऊन येणाऱ्या शालेय विद्यार्थी व प्रवाशांच्या चहापाण्याची व पिण्याच्या पाण्याची सर्व हॉटेल्स बंद असल्याने प्रचंड गैरसोय झाली यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!