ताज्या बातम्यानांदेडराजकारण

प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक काँग्रेसचे एकमत

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणूक विधानसभाच्या सार्वत्रिक निवडणूकी सोबतच होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार (ता.९) रोजी जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे विशेष बैठक बोलविण्यात आली होती.

या बैठकीत लोकसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस कडून स्व.खा.वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा.रवींद्र चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात यावी ह्या ठरावावर स्थानिक काँग्रेसचे एकमत झाले आहे. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीच्या ठरावावर जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी आ. इश्वराव भोसिकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी अनुमोदन देत ठराव संमत केला.

दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी सोबतच होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार (ता.९) रोजी जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे विशेष बैठक बोलविण्यात आली होती.

या बैठकीत लोकसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस कडून स्व.खा.वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात यावी ह्या ठरावावर स्थानिक काँग्रेसचे एकमत झाले आहे. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीच्या ठरावावर जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी आ. इश्वराव भोसिकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी अनुमोदन देत ठराव संमत केला.

यावेळी दिलीप पाटील बेटमोगरेकर, श्याम दरक, अनिल मोरे, जे. पी. पाटील, डॉ. रेखाताई चव्हाण, बाळासाहेब रावणगावकर, महेश देशमुख, अब्दुल गफार, अजिज कुरेशी, सुभाष किन्हाळकर, बालाजी गाडे, सुभाष रायबोळे, गंगाधर सोनकांबळे, प्रफुल्ल सावंत, पप्पू पाटील कोंडेकर, प्रल्हाद पाटील, माधव पवळे, मनोहर पाटील शिंदे, शंकर शिंदे.

संजय शेळगावकर, मुन्ना अब्बास, विलास पावडे, विकास कदम, विठ्ठल पावडे, सतिश देशमुख, निरंजन पावडे, सुरेश हटकर, सत्यपाल सांवत, बापूसाहेब पाटील, मुन्तजिंब, सुभाष लोणे, शरद पवार, सुनील वानखेडे, पप्पू बेग, प्रताप देशमुख, इंजि. नसिम पठाण, गणेश वजिरगावकर, आत्माराम वानोळे पाटील, धनंजय उमरीकर, अनिल कांबळे, गंगाप्रसाद काकडे, जेशिका शिंदे, संतोष बारसे, रंगराव भुजबळ, आनंदसिंह ठाकूर, कुलदिप ठाकूर, सुनील कांबळे, गोविंद पाटील, प्रथमेश गिरी, आदीसह इतर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker