चिकना येथील जुगार अड्ड्यावर धाड ; 12 आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या पथकाची धडाकेबाज करवाई...

सौ.मीना भद्रे
धर्माबाद :- धर्माबाद तालुक्यांतील मौजे चिकना येथे एका घरा समोर मोकळ्या जागेत तिरट नावाचं जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती धर्माबाद पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी तातडीने एक पथक तयार करून सदरील जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता या ठिकाणी तिरट नावाच्या जुगार सुरू होता व त्यावर पैसे लाऊन सदरील जुगारी जुगार खेळत असल्याचे अधळून आले याप्रकरणी एकूण 12 आरोपी विरुध्द धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 लाख 38 हजार 940 रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.
तालुक्यात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन अक्षन मुड वर आले आहे ग्रामीण भागातील सुरू असेलल्या जुगार अड्ड्या संदर्भात गुप्त माहिती प्राप्त होताच पोलीस पथकाकडून तेथे कारवाई केली जात आहे. चिकना या गावी तिरट नावाचा जुगार पैसै लाऊन खेळत असल्याची माहिती प्राप्त होताच.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी तातडीने एक पथक तेथे पाठवले असता त्या ठिकाणी विश्वास आत्माराम आवरे यांच्या घरा समोरील मोकळ्या जागेत आरोपी विश्वास आवरें, गंगाधर आवरे, ईश्वर आवरे, अब्दुल करीम अब्दुल खादर, अवधूत आवरे, साहेबराव आवरे, साईनाथ जुंगुलवाड, केशव कदम,शेख जलील, रमेश जुंगुलवार, साहेबराव ढेले सर्व राहणार चिकना हे या ठिकाणी गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार पैसे लाऊन खेळत असल्याचे अढळून आले.
जुगाराचे साहित्य एकूण चार मोटार सायकल असा मिळून पोलिसांनी सुमारे 1 लाख 38 हजार 940 रुपयांचा मुदेमाल जप्त केला असून पोहेकॉ महेश माकुलवार यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक आडे हे पुढील तपास करीत आहेत.
तालुक्यात कोणत्याही प्रकारची अवैध धंदे चालू देणार नाही असा इशारा पोलिसानी दिला आहे.ज्या भागात असे प्रकार सुरू असतील तर नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गुप्त माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.