गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी पोलीस ठाण्या अंतर्गत ८४ ठिकाणी ‘श्रीं” ची स्थापना

कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या ८४ ठिकाणी श्रीं” ची स्थापना ७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात वाजतगाजत मिरवणुका काढून करण्यात आली. शहरी भागात ४७ व ग्रामीण भागात ३७ ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली. यात १६ गावांत एक गाव एक गणपती या संकल्पनेतून श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

कुंडलवाडी शहर व परिसरात ८४ गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना शनिवारी ७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात,आनंदात वाजत गाजत करण्यात आले आहे. कुंडलवाडी शहरात भक्ती गणेश मंडळ, विद्यार्थी गणेश मंडळ,बळीराजा गणेश मंडळ, स्वराज गणेश मंडळ, वंजारी समाज गणेश मंडळ, श्री सूर्य गणेश मंडळ, मोरया गणेश मंडळ, श्री महाकाल गणेश मंडळ.

शिव गणेश मंडळ, श्री बाळ गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, आदर्श गणेश मंडळ, विक्रांत गणेश मंडळ,संत गाडगेबाबा गणेश मंडळ, बजरंगी गणेश मंडळ, संघर्ष गणेश मंडळ, एकता गणेश मंडळ, सूर्यवंशम गणेश मंडळ, श्री विघ्नहर्ता गणेश मंडळ, हिंदवी गणेश मंडळ, महाराजा गणेश मंडळ, केसरी गणेश मंडळ, भगवती गणेश मंडळ, पार्वतीपुत्र गणेश मंडळ, श्री बाळ गणेश मंडळ,श्री शक्ती गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, नरागल्ली गणेश मंडळ,न्यू गणेश मंडळ.

बाळ गणेश मंडळ, गंगापुत्र गणेश मंडळ, श्री चक्रधर गणेश मंडळ, श्री गजानन गणेश मंडळ, शिव गणेश मंडळ,दर्शन गणेश मंडळ,नवयुवक गणेश मंडळ, न्यू शक्ती गणेश मंडळ, शिवशक्ती गणेश मंडळ, जय किसान गणेश मंडळ, शक्ती गणेश मंडळ, जय जवान गणेश मंडळ, वरद गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, शिवशंकर गणेश मंडळ, माऊली गणेश मंडळ, श्रीराम गणेश मंडळ, क्रांती गणेश मंडळांनी शहरात श्रीची स्थापना मोठ्या धुमधडाक्यात केली आहे.

शहरा व्यतिरिक्त ग्रामीण भागातील टाकळी, मनुर, दौलापूर, विळेगाव (थडी), शेळगाव(थडी) ,संगम, ममदापूर, नागणी, कोटग्याळ, हरनाळी, डौर, मोकली, माष्टी, चिरली, कौठा, गुजरी गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

सण-उत्सवाच्या काळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, सामूहिक एकता, बंधुता कायम राहून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावागावात शांततेचे वातावरण राहावे याकरिता कुंडलवाडी पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळे,पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष यांच्या मिटींगा घेऊन त्यांना मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker