ताज्या बातम्यानांदेडबिलोली

गोमास विक्री करणारा रामतीर्थ पोलिसांच्या जाळ्यात ; ३७०००० रुपयाचा मुद्देमाल जप्त

मोरे मनोहर

किनाळा :- एका पिकप वाहनांमध्ये नांदेड कडून हैदराबाद कडे गोमास घेऊन जाणारा रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे केरूर शिवारात 350 किलो गोमास 200 प्रमाणे सुमारे 70000 रूपये किमतीचे व पिकअप वाहन 3 लाख रुपये किंमतीचे असा एकूण तीन लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल दिनांक 17 जानेवारी रोजी पकडून रामतीर्थ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की नांदेड ते हैदराबाद रोडवर रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आदमपूर शिवारात नांदेड येथून एम एच 26 बि ई 3742 मध्ये साडेतीनशे किलो गोमास प्रति किलो दोनशे रुपये प्रमाणे 70 हजार रुपयाची आपल्या ताब्यातील पिकप मध्ये घेऊन विक्री करण्याच्या उद्देशाने नांदेड ते हैदराबाद रोडने हैदराबाद कडे घेऊन जात असताना आदमपूर फाटा दरम्यान रामतीर्थ पोलिसांना मिळून आला.

या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे प्रकाश बेळीकर यांच्या फिर्यादीवरून पिकप चालक अब्बास मेहमूद खुरेशी वय ४६ राहणार इतवारा नांदेड यांच्याविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात भाग 6 गुरन 07 /2026 कलम 5 क 9 अ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सूर्यवंशी व बेळीकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker