ताज्या बातम्यानांदेडनायगांव

संशयित राशनचा टेंपो पकडला ; टेंपोसह २६ लाखाचा मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नरसी देगलुर रोडवर शंकरनगर परीसरात आज शनिवारी पहाटे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने रेशनच्या तांदळाने भरलेला संशयित आयचर ट्रक पकडला असून या कारवाईत ट्रक चालकास ताब्यात घेऊन १७ टन तांदूळ व ट्रक सह २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वीच नायगाव तालुक्यातील कुंटुर फाट्यावरील खाजगी गोदामावर पोलिस पथकाने धाड टाकून अंगणवाडीतील लहान बालकांना देण्यात येणा-यां सकस आहाराचे पाकिटे आढळून आल्याने कार्यवाही केली होती.आज या भागात विशेष पथकाने दुसरी कार्यवाही केली आहे.

नांदेड जिल्ह्यात फोफावल्या अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्यासाठी पोलिस प्रशासनाचे विशेष पथकाकडून सध्या अवैध धंद्यांविरूद्ध कार्यवाही ची मोहीम राबवली जात आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याविरोधात ऑपरेशन फ्लॅश ऑऊट मोहिम राबविली जात आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी कुंटूर फाटा येथे एका खाजगी गोदामावर पोलिस पथकाने धाड टाकली होती. यात अंगणवाडीतील लहान बालकांना देण्यात येणा-यां सकस आहाराचे पाकिटे सापडले होते. त्यामुळे पोलिसांकडून गोडाऊन शिल केले याबाबत चौकशी सुरू असतानाच आज शनिवारी भल्या पहाटे नरसी देगलूर रोडवर शंकरनगर परीसरात तांदळाने भरलेला आयचर ट्रक असल्याची गुप्त माहीती पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली त्यावरून पथकाने शनिवारी पहाटे सदर ट्रक शंकरनगरजवळ पकडून तपासणी केली असता त्यात १७ टन तांदळाचे कट्टे आढळून आले.

सदर तांदळाबदल संशय आल्याने पथकाने ट्रक क्र. एम. एच. २६ बी. ई. ७०१२ हा आयचर ट्रक रामतीर्थ पोलिस ठाण्यात लावला आहे. जप्त करण्यात १६ टन तांदुळ किंमती ४ लाख २० हजारचा व आयचर वाहन किंमती टेंपोची किमत २२ लाख असा एकुण २६ लाख २० हजाराचा चा संशयीत माल मिळुन आल्याने ट्रक चालकास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन रामतिर्थ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर तांदूळ रेशनचा आहे का,याची तपासणी करण्यासाठी बिलोली तहसीलला पत्र पाठविण्यात आले असून आहवाल आल्यावरच पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती स.पो.नि.श्रीधर जगताप यांनी दिली. सदरची कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार,अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड, उदय खंडेराय पोनि स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील व्ही. एस. आरसेवार, सपोनि, पोहेकों बालाजी पोतदार, सोनबा मुंडकर, पोना कृष्णा तलवारे, पोकों नारायण येंगाले, अनिल वाघमारे यांनी कामगीरी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker