पोलीस विभागाकडून महिलांसाठी हेल्पलाइन सुरू

कुंडलवाडी :- बदलापूर येथील मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यातील पोलीस विभागाकडून महिलांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून महिलांबाबत अत्याचाराच्या घटना व संकटकाळी मदतीसाठी ही हेल्पलाइन पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी दि.१२ सप्टेंबर रोजी आदेश जारी केले आहे.
अलिकडच्या काळात बदलापूर येथील शाळेतील कंत्राटाने नेमलेल्या कर्मचाऱ्याने तीन-चार वर्षाच्या दोन लहान मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचाराधी घडलेली घटना तसेच राज्यात इतर भागात घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने, महिला व बालकांवर झालेल्या अत्याचारांची माहिती सुलभपणे व तात्काळ पोलीस यंत्रणांमार्फत पोहचण्याकरिता विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग या कार्यालयात दोन समर्पित मोबाईल नंबर व एक लॅन्ड लाईन नंबर महिलांसाठी हेल्पलाईन म्हणून कार्यरत करण्यात आले आहेत.
सदर हेल्पलाईनचे मोबाईल क्रमांक, ८९७६००४१११ व ८८५०२००६०० तसेच दूरध्वनी क्र. ०२२-४५१६१६३५ आहेत. तरी महिलांनी अत्याचाराची माहिती किंवा संकटकाळी उपरोक्त हेल्पलाइन नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.