क्राईमताज्या बातम्याबिलोली

कुंडलवाडी पोलिसांकडून ओव्हरलोड वाळू वाहतुकीचा टिप्पर पकडला

कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलिसांकडून कुंडलवाडी ते नागणी रोडवर वाळूची ओव्हरलोड वाहतूक करणारे टिप्पर क्र. एम एच ०४ इएल ८४९० कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोहेकाँ मिलिंद नरबाग हे पेट्रोलिंग वर असताना दि.१४ सप्टेंबर रोजी ४ वाजता पकडण्यात आले.

सदरील टिप्पर वर कलम २०७ नुसार कार्यवाही करून पुढील कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयास पत्र व्यवहार करण्यात आले असून सदरील ओव्हरलोड वाहतुकीचा टिप्पर कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणून लावण्यात आला आहे.

याबाबत पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती कुंडलवाडीपोलिसांकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker