ताज्या बातम्यानांदेडनायगांव

शंकरनगर मराठी पत्रकार संघाच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान

मोरे मनोहर

किनाळा :- शंकरनगर ता. बिलोली येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शंकरनगर येथे विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शंकरनगर ता.बिलोली येथे डॉ.सौ.छाया एम.धुप्पेकर, व शुभांगी सुधाकर शिंदे या दोन्ही महिला सामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी वैद्यकीय क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा आणि कै.मधुकरराव पाटील खतगावकर महाविद्यालयात शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापिका पदावर काम करणाऱ्या डॉ.एन.एम.ढेकळे, डॉ.रेखा इंगोले, डॉ.अशा तानाजी आईलवार व व्यापारी क्षेत्रातील सौ.गंगासागर मनोहर मोरे, रामतीर्थ पोलीस ठाण्यात पोलिस आमालदार या पदावर सक्रिय कार्य करणाऱ्या सौ.नागमनी मारोती कांबळे, सुप्रिया दत्तात्रेय मगर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन येथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शंकरनगर येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने विशेष कार्य करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान करून नारीशक्तीला बळ देण्याचे कार्य केले परंतु आजही ग्रामीण भागात महिलांचे अधिकार महिलेला न देता पुरुषप्रधान संस्कृतीचा वारसा जोपासला जातो त्यामुळे महिलेची कुचंबना होताना दिसून येते त्यामुळे महिलेना महिलेचे अधिकार बजावण्याची संधी दिली पाहिजे असे मत प्रा.डाॅ.प्रा.डाॅ.शिवाजी कांबळे यांनी व्यक्त केले.

यावेळीजेष्ठ पत्रकार प्रा.डॉ.दयानंद माने, डॉ.शिवाजी कांबळे व तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बरगे,जेष्ठ पत्रकार मनोहर मोरे, नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष हणमंत पाटील वाडेकर, शेषेराव कंधारे, सत्तार
इनामदार, आनंदराव पाटील डाकोरे, ज्ञानेश्वर पाटील तोडे, गंगाधर कांबळे, तानाजी शेळगावकर, यासह कै.मधुकरराव पाटील खतगावकर महाविद्यालयाचे प्राचार्य पाटोदेकर, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनि श्रीधर जगताप, बिट जमादार शिवशंकर शिंदे, कुलकर्णी, फेरोज आदिसहसह अनेक जण उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker