ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

लबाड सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांचा अंत पाहू नये : खा.रवींद्र चव्हाण यांचा सरकारला इशारा

अंकुशकुमार देगावकर

नांदेड : मागील तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे आणि नदी नाल्यांना आलेल्या महापुरामुळे सर्वत्र हाहाकार सुरू सुरू आहे. त्यामुळे खासदार रवींद्र चव्हाण यांनी भर पावसात ‘आँन फिल्ड’ शेतकरी व नागरिकांना धिर देण्याचे काम सातत्याने करत असून. लबाड सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये असा इशाराही दिला आहे.

निसर्गाचा प्रकोप काही कमी होण्याची चिन्हे दिसेनासी झाली आहेत त्यामुळे यंदाचा खरिप हंगाम पुर्णतः पाण्यात गेला असून. ऐन सनासुदीच्या काळात अतिवृष्टी व पुर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सण साजरे कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पावसामुळे मुड उडीद तर गेलेच सोयाबीनचा चिखल झाल्यामुळे हातात काहीच आले नाही उलट नदी काठच्या जमीनीवर पिके तर गेलीच पण मातीही शिल्लक राहिली नाही.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अर्थिक संकटात असता सरकार केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम करत आहेत तर दुसरीकडे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जवळपास दिड महिण्यापासून गायब आहेत. त्यामुळे आँगष्टमधील अतिवृष्टी असो कि मागच्या तीन चार दिवसापासून सुरू असलेला पावसाचा हाहाकार. यात भर पावसात खासदार रवींद्र चव्हाण ‘आँन फिल्ड’ शेतकरी व नागरिकांना धिर देण्याचे काम सातत्याने करत आहेत.

नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात जवळपास एक महिन्यापासून पावसाने महारुद्र रूप धारण केले आहे या पावसामध्ये नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे आज नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील निळा, एकरा, तळणी, लिंबगाव, वाढवणा, पिंपरी या अनेक गावातील शेतकऱ्याची झालेली बेहाल परिस्थिती खासदार रविंद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली व लबाड सरकारने संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा अंत पाहू नये असा सरकारला इशारा देतानाच झोपेचे सोंग न घेता तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, विठ्ठल पावडे, निरंजन पावडे, काँग्रेस पक्षाचे सर्व युवक काँग्रेस पदाधिकारी पूरग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker