जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यासाठी 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
मोरे मनोहर
किनाळा :- जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे इयत्ता सहावी प्रवेश परीक्षा 2025 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची 23 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून जे विद्यार्थी आपले प्रवेश परीक्षेचे भरले नसतील अशा विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज भरावे असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री सुहास मांडले यांनी कळविले आहे.
इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या शासनमान्य शाळेतील होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी साठी प्रवेश दिला जातो यासाठी 2025 मध्ये इयत्ता सहाव्या वर्गात प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज घेण्याची मुदत संपलेली होती परंतु शासनाने ही ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढ दिली असून जे विद्यार्थी या परीक्षेला बसण्यापासून वंचित राहिले असतील अशा विद्यार्थ्यांनी 23 सप्टेंबर 2024 वार सोमवार पर्यंत हे प्रवेशअर्ज ऑनलाइन भरू शकतात यासाठी नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त शाळेतील इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी हा फॉर्म http://www.navodaya.gov.in या संकेत स्थळावर जाऊन नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा लिंक ला क्लिक करून हा फॉर्म भरु शकतो.
नांदेड जिल्ह्यातील शासनमान्य शाळेतील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांच्या पालकांनी इयत्ता पाचवी शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे ऑनलाइन फॉर्म येत्या 23 सप्टेंबर 2024 पर्यंत भरावे असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर जिल्हा नांदेड चे प्राचार्य श्री सुहास मांडले आणि या निवड प्रवेश परीक्षेचे प्रभारी श्री विष्णू यादव यांनी केले आहे.