कुंडलवाडी शहरात विविध ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहरातील विविध ठिकाणी दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. शहरातील नगरपरिषद येथील प्रांगणात नगर परिषदेचे प्रशासक तथा बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे,विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार,पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुश्री दरेगावकर, कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार विद्यालय येथे मार्कण्डेय एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा कुसुमताई सब्बनवार, उर्दू प्राथमिक व हायस्कूल शाळेत संस्थेचे मार्गदर्शक एम.ए.जलील सर नांदेडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती बाबाराव भाले, के.रामलू पब्लिक स्कूलमध्ये श्री कुंडलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका रमा ठक्कुरवार, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत मुख्याध्यापक पी.जी.सोनकांबळे, जिल्हा परिषद हायस्कूल येथे मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार, शाहू महाराज प्राथमिक शाळेत डॉ.हेडगेवार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.