गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली
श्रुती किनाळकरचे वैद्यकीय प्रवेशपरीक्षेत यश
मोरे मनोहर
किनाळा :- तालुका बिलोली येथील कुमारी श्रुती माधवराव किनाळकर हि अथक परिश्रम जिद्द व अभ्यासाच्या बळावर घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत 671 गुण घेऊन घवघवीत यश संपादित करून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत नॅशनल मेडिकल कॉलेज नायर (टोपीवाला) मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्राप्त केला.
तिच्या या सुयशाबद्दल तिचे किनाळा येथील संजय पाटील वाघमारे, शिवकांत महाराज नंदे संगमेश्वर पाटील मोहिते, होटाळ्याचे माजी उपसरपंच गणेशराव भद्रे, आनंदा उगे, पत्रकार मनोहर मोरे यांनी नरसी येथील माऊली ज्वेलर्स येते कुमारी श्रुती माधवराव किनाळकर हिचे स्वागत करून तिच्या पुढिल शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिले.