बिलोलीच्या पुरवठा विभातील अनागोंदी कारभाराने कळस गाठला जनतेची खुलेआम लुट
New Bharat Times नेटवर्क
बिलोली : तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात कंत्राटी कर्मचारी नसलेल्या कर्मचाऱ्यांची तात्काळ हाकालपटी करा हकालपटी नाही झाल्यास तहसिल कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते शेख पाशा गादीवाले यांनी एका निवेदनाव्दारे दिला आहे.
बिलोलीच्या तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अनागोंदी कारभाराने कळस गाठला आहे. शासनाचे कसल्याही प्रकारचे आदेश नसताना तहसिलच्या पुरवठा विभागातील अधिकारी आपल्या मर्जीतील खाजगी व्यक्तीना मलिद्याची खुर्ची बहाल केली आहे.
नवीन राशनकार्ड काढण्यासाठी व राशनकार्डमध्ये नाव कमी करणे किंवा समाविष्ट करणे, कुटुंब विभक्त करुन राशनकार्ड देणे या कामी या एजंटामुळे एक प्रकारची बोली लागत आहे. पुरवठा विभागातील काम्प्युटर सिस्टम केवळ खाजगी व्यक्तीच्या कब्जात गेले आहे. त्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पुरवठा विभागात कामाच्या नावाखाली अक्षरशः लुटले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने या पुरवठा विभागातील खाजगी लुटारुना व दलालाना खुर्चीवर बसण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांची देखील चौकशी झाली पाहीजे. तसेच त्यांना खुर्चीवरुन तात्काळ हाटवुन शासनाच्या वतीने सर्व टेबलावरती कर्मचारी नियुक्त करावे विशेष म्हणजे या तालुक्यात ९६ राशन दुकान आहेत प्रत्येक दुकान दाराकडुन दरमहा ३ ते ४ हजार रुपये प्रति महिना वसुली केली जात असल्याचे काही दुकान दारानी दबक्या आवाजात नांव न सांगण्याच्या अटीवर बोलले असुन बाहेर देखील ही चर्चा होताना दिसत असल्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
बिलोलीच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात नेमक चाललय तरी काय? आण हे सर्व चालत असताना येथील अधिकाऱ्यांना कसं काय दिसत नाही, याचा अर्थच असा दिसून येतो की, या सर्व दलाल मंडळीना संबंधित अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण सहमती आहे की काय? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
आज स्थितीला पुरवठा विभागातील प्रभारी अधिकारी म्हणून नायब तहसिलदार पदमवार यांच्याकडे पदभार आहे. परंतु या अधिकाऱ्यांनी ही आपल्या अर्थिक फायद्यासाठी या लुटारु व्यक्तीना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. यामुळे राशनकार्ड संबधाने येणाऱ्या बहुतांश लोकांना याचा ञासही सहन करावा लागत आहे. याशिवाय या पुरवठा विभागातील एक दोन शासकीय कर्मचाऱ्यांचे टेबलही बदलण्याची तक्रार देण्यात आली आहे.
येत्या तीन दिवसात कोणतेही आदेश नसलेल्या या खाजगी लुटारु कर्मचाऱ्यांची तात्काळ हाकालपटी करावी अन्यथा १७ सप्टेंबर २०२४ योजी तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते शेख पाशा हुसेनसाब गादीवाले यांनी दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रति तहसिलदार,बिलोली यांच्यासह वरीष्ट अधिका-यांना देण्यात आले आहे.