तळेगांव ऊमरी रोडवर राशनच्या धान्याचे दोन ट्रक पकडले : 45 लाखाचा मुद्देमाल उमरी पोलीसांच्या ताब्यात
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत राशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे कंबरडेच मोडण्याची मोहीम जिल्हा पोलीस अधिक्षकांनी राबवण्यास सुरुवात केली आहे. काल रामतीर्थ येथे एक तांदळाचा टेंपो पकडला असतांनाच कालच रात्री उमरी तळेगांव रोडवर गहू व तांदळाणे दोन ट्रक विशेष पथकाने पकडले आहेत. संशयित राशेनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक किमंती अंदाजे ४५ लाख रुपयाचा मुद्देमाल उमरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तळेगांव येथीलच माफीया राशनच्या धान्याच्या काळाबाजाराचे राँकेट चालवत होता.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील राशनच्या धान्याचा काळाबाजार बंद करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून जिल्हाभर मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत तीन कारवाया करण्यात आल्या आहेत.यात शनिवारी पहाटे नरसी शंकरनगर रोडवर 17 टन तांदळाचा टेंपो पकडला तर कालच सायंकाळी उमरी तालुक्यातील तळेगांव येथे गहू व तांदळाचे दोन ट्रक पकडले आहेत. ज्याचं दोन ट्रक पकडले आहेत त्या राशन माफीयाचे तळेगांव उमरी रोडवर गोडाऊन असून तेथूनच तो राशनच्या धान्याच्या काळ्याबाजाराचे रँकेट चालवत होता असे बोलल्या जात आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षकांनी स्थापन केलेल्या पथकाला सदरची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने कारवाई करण्यासाठी निघाले असता उमरी तळेगाव रोडवरुन एक आयचर ट्रक क्रमांक एम एच २६/ बी ई ७३३७ मध्ये संशयित राशेनचे गव्हाचे कट्टे किमंती अंदाजे ४ लाखाचे व टूक क्रमांक एम एच २६/ बी ई ७८३५ ट्रकमध्ये तांदळाचे कट्टे असलेला किमंती अंदाजे १ लाख रुपयांचे आढळून आले. हे दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले असून. दोन्ही वाहनाची किमत मिळुन ४० लाख रुपये असा एकुण ४५ लाख रुपयाचा संशयित माल मिळुन आल्यांने सदर दोन्ही वाहने ताब्यात घेऊन उमरी पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले आहे.
सदर प्रकरणी पुरवठा विभागास पत्रव्यवहार करण्यात येत असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने आतापर्यंत चार कारवाया केल्या आहेत. पण या प्रकरणात पुरवठा विभागाकडून अहवाल मागवून कारवाई करण्यात येईल असे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात येत आहे. पण सदरचे धान्य कुठून आले कोण खरेदी केले कुठे चालले होते याबाबत काहीही कारवाई होताना दिसत नाही. विशेष म्हणजे कारवाई करण्याची मोहिम सुरु असतानाही काळाबाजार सुरुच असल्याने या गोरखधंद्याला कुणाचे पाठबळ आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.