ताज्या बातम्यानांदेडनायगांव

भाजपाला मोठा धक्का भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

मोरे मनोहर
किनाळा :- माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांचे मेहुणे राज्याचे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब आणि डॉ.मीनल ताई निरंजन पाटील खतगावकर हे भाजपाला अखेरचा रामराम ठोकत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व माजी मंत्री आमदार अमित भैया देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केले असल्याने भाजपाला याचा मोठा धक्का बसला असुन खतगावकर यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाने काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या या पक्षप्रवेशाचा ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

राजाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात गेले असता ते मंत्रिमंडळात जातील आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होईल हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासोबत जाण्याचा निर्धार भास्करराव पाटील खतगावकर यांनी घेतलेला होता. भास्करराव पाटील भाजपात गेल्यानंतर भाजप पक्षाचे प्रामाणिक काम करू नाही त्यांनी केलेल्या कार्याची कसलीही नोंद न घेता त्यांचा पदोपदी अपमान केला जात असल्याने अखेर दादांनी भाजपाला धक्का देत पुन्हा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.

नांदेड मधील विस्कळीत झालेला काँग्रेस पक्ष पुन्हा बळकट होईल आणि येणाऱ्या नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला दादांचा नक्कीच मोठा फायदा होईल असे बोलले जात असुन दादांनी आज केलेल्या पक्षप्रवेशांचा ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker