ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी

कुंडलवाडी :- मुस्लीम समाजाचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस कुंडलवाडी शहरात दि.२१ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी ईद-ए- मिलाद निमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून अमन रथ द्वारे शांतिचा संदेश देत मिरवणूक काढण्यात आली.

मुस्लिम बांधवांमध्ये हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीला विशेष महत्त्व आहे.गणेशोत्सव काळातच १६ सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद हा सण आल्यामुळे पोलिस प्रशासनाने शहरातील मुस्लिम समाज बांधवाची बैठक घेतली होती. या बैठकीत मुस्लिम समाज बांधवांनी पोलीसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ईद-ए-मिलाद सण २१ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे बांधवांनी गत काही दिवसांपासूनच मिरवणुकीची तयारी केली होती. यानुसार शहरात मोहमंद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त मुनवर मस्जिद पासुन शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करून मुस्लिम समाज बांधवांना खाऊ,शरबत चे वाटप करण्यात आले. शहरातील मस्जिदवर आकर्षक रोषनाई करण्यात आली होती.

तसेच विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रमही राबविण्यात आले
यावेळी वसीम हाफीजसाब, मुस्ताख हाफीजसाब, यासीन हाफीजसाब, नवाब मौलीसाब, माजीद हाफीजसाब, अब्बु हाफीजसाब या मुस्लिम धर्मगुरू सोबतच शहरातील चारही मस्जिद कमिटीचे सदर तसेच कुंडलवाडी पोलीसांचा ईद-ए- मिलाद कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला. मिरवणुकीचा समारोप मुनवर मस्जिद येथे करण्यात आले. यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले. यावेळी ईद-ए-मिलाद-उन- नबी कमिटीचे अध्यक्ष मैनोद्दीन मगदुमसाब शेख, उपाध्यक्ष हाजी इब्राहिम शेठ खाजामियाँ यांच्यासह शहरातील मुस्लिम समाज बांधव,लहान मुले,तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, गृहरक्षक दलाचे जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker