ताज्या बातम्यानांदेडबिलोली
कुंडलवाडी पोलिसांकडून ओव्हरलोड मुरूम वाहतुकीचा टिप्पर पकडला

कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलिसांकडून शहरातील चुंगीनाका येथे मुरूमाची ओव्हरलोड वाहतूक करणारे टिप्पर क्र.एम एच २६ बी ४८४० वाहन कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोकाँ अमरनाथ शिंदे यांनी पेट्रोलिंग वर असताना दि.२० सप्टेंबर रोजी ६ वाजता पकडण्यात आले.
सदरील टिप्पर वर कलम २०७ नुसार कार्यवाही करून पुढील कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयास पत्र व्यवहार करण्यात आले असून सदरील ओव्हरलोड वाहतुकीचा टिप्पर कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणून लावण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती कुंडलवाडी पोलिसांकडून देण्यात आली आहे.