सिमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : केंद्रीय मंत्री मा.रामदास आठवले साहेब यांच्या सौभाग्यवती तथा रिपाई महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सिमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडाळकर यांच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) गटाच्या महीला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सौ. सिमाताई आठवले यांचा वाढदिवस दरवर्षी राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. नायगाव तालुक्यातही सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. रिपाइंचे व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडाळकर यांच्या पुढाकारातून नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी सिध्दार्थ गायकवाड, किरण वाघमारे, किरण इंगळे, ज्योतिबा वाघमारे, कपील भद्रे, किशोर सुर्यवंशी, गौतम वाघमारे यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.