ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मराठा आरक्षण : नायगाव बंदला शंभर टक्के प्रतिसाद

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी पुकारलेल्या नायगाव बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून. शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठान बंद ठेवून सहभाग नोंदवला आहे. शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार होवू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून अतिरिक्त कुमक मागवली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सरटी येथे मागच्या सात दिवसापासून अमरण उपोषण सुरु केले आहे. मागच्या सात दिवसात सरकारने मराठा समाजाच्या मागण्याबाबद सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाने सोमवारी बंदची हाक दिली होती. त्याचबरोबर सकल मराठा समाजाने बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सोमवारी नायगाव शहरासह ग्रामीण भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

नायगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून पाठींबा दर्शवला. विशेष म्हणजे बंदच्या पार्श्वभूमीवर नायगाव येथील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. विशेष म्हणजे मराठा समाजाच्या तरुणांनी शांततेत आंदोलन केले तर काही ठिकाणी जरांगे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सुजित कुंभार यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तर ठेवलाच होता पण अधिकची कुमक मागवली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker