ताज्या बातम्यानांदेडबिलोली

व्यसनापासुन आपले कुटुंब दुर ठेवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -डॉ.पुजा काळे

मोरे मनोहर
किनाळा :- अलिकडच्या धावपळीच्या जीवनात प्रतेक माणुस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करित आहेत त्यामुळे सहज बरे होणारे आजार देखील दुर्लक्ष केल्याने महागात पडतो आपण घर स्वच्छ ठेवतो,चेहरा सुंदर दिसावा म्हणून अनेक सौंदर्य प्रसाधने वापरतो पण आपल्याच कुटुंबातील अनेक मंडळी मुख स्वच्छतेकडे दुर्लक्ष करुन तंबाकु, गुठखा तोंडांत टाकतात, बिडि, सिगारेट, आणि दारू पितात यामुळे अनेकांना तोंडाच्या कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडावे लागते अशा व्यसनापासुन आपले कुटुंब दुर ठेवण्यासाठी आता महिलांनी पुढाकार घ्यावा असे डॉ. पुजा काळे यांनी आवाहन केले.

संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या वतीने किनाळा तालुका बिलोली येथील शाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात बिलोली उपजिल्हा रुग्णालयातील दंत चिकित्सक डॉ पुजा काळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना ते पुढे बोलताना म्हणाल्या की आपले आरोग्य निरोगी व सुदृढ व्हावे यासाठी सर्वप्रथम आपण व्यसनमुक्त असले पाहिजे आणि व्यसनमुक्त ही आज काळाची गरज आहे आणि यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेऊन आपल्या कुटुंबातील व्यक्तींना व्यसनापासून दूर ठेवले पाहिजे याचबरोबर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावे असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम समुपदेशक बोईवार सर यांनी आजार मुक्त कुटुंब, आजार मुक्त गांव ,आजार मुक्त देश झाला पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजेअसे आवाहन केले. यावेळी गावातील 20 बचत गटांतील महिलेसह उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीयअधिकारी चौहान सर, समुपदेशक बोईवार सर, तांत्रिक सहाय्यक अन्सार सर यासह संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी चे समन्वयक मारोतराव वडे हे उपस्थित होते.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सरपंच विठ्ठल आनंदराव माने उपसरपंच बालाजी पाटील भोसले, चेअरमन तंटामुक्ती अध्यक्षासह सर्वांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी चे समन्वयक मारोतराव वडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker