कौडगावचे सरपंच बापूसाहेब पाटील कौडगावकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : हिंदू धर्मात आठरापगड जाती आहेत असूद्या मात्र जेव्हा धर्मावर संकट येत असेल तर सर्व हिंदू बांधव एकत्र आले पाहीजे असा मौल्यवान संदेश सुप्रसिद्ध ह.भ.प.पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणेकर यांनी मौजे कौडगाव (ता.उमरी ) येथे युवा नेते तथा सरपंच बापूसाहेब पाटील कौडगावकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात उपस्थित भाविकांना केला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व आ.राजेश पवार यांचे खंदे समर्थक कौडगावचे सरपंच बापूसाहेब पाटील कौडगावकर यांचा वाढदिवस काल दिनांक १ ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यात कौडगांव येथे मारोती मंदिर दर्शनाने वाढदिवसाला सुरूवात करण्यात आली व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे हार अर्पण करून बिजेगाव येथे श्री.दत्त मंदिर दर्शन, उमरी येथे बालाजी मंदिर दर्शन, सदानंद बाबा महाराज मंदिरामध्ये दर्शन, उमरी ग्रामीण रुग्णालयामध्ये ब्लॅंकेट व फळे वाटप, उमरी येथे मोंढा मध्ये जिवलग मित्र गजानन पाटील होटाळकर यांच्या वतीने भव्य क्रेन हार घालून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर ईज्जतगाव येथे भवानी मातेचे दर्शन,येंडाळा येथे हनुमान मंदिर येथे महाप्रसादाच आयोजन, मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कौडगांव, येंडाळा, महाटी विद्यार्थ्यांना वह्या, डेक्स, जिल्ह्यामध्ये कबड्डी संघामध्ये दुसरा क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी वाटप, तालुक्यामध्ये धावण्यामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी वाटप, बौद्ध विहार कौडगांव येथे अभिष्टचिंतन, ग्रामपंचायत कौडगांवच्या वतीने वृक्षारोपण, कौडगांव,येंडाळा,महाटी उमरी तालुक्याच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प.पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत सौ.पूनमताई राजेश पवार, रमेशराज बाबा शास्त्री बिजेगावकर, अरविंद महाराज उमरी, मनोज पाटील मोरे, गणेशराव पाटील कोडगावकर, पारस सेठ दर्डा, डॉ.विक्रम देशमुख तळेगावकर, व्ही.आर कोंडेकर निवृत्त गटविकास अधिकारी, तहसीलदार प्रशांत थोरात, पी.आय माने साहेब, गटविकास अधिकारी अडबलवार साहेब, तलाठी पांडे साहेब, ग्रामसेवक फुलारी साहेब, मनोज आरगुलवार, पत्रकार बाळासाहेब पांडे, नरेंद्र येरावार व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, स्तरातील मान्यवरांनी अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अथक परिश्रम बापूसाहेब पाटील कौडगांवकर मित्र मंडळ उमरी यांनी घेतले व यशस्वी पार पडला.