गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी सोसायटीच्या सर्वांगिण विकासासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार

◆ जलसिंचन योजनेची कर्जमाफी अंतिम टप्प्यात ◆शेतकरी सभासदांचा सातबारा लवकरच कोरा होणार ◆चेअरमन सुनील बेजगमवार

कुंडलवाडी :- कुंडलवाडी सोसायटीस ३१ मार्च २०२४ अखेर १ लाख ९ हजार रुपयांचा नफा झाला आहे.सोसायटी निवडणुकीत शेतकरी सभासद मतदाराला दिलेले जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीचे आश्वासन हे अंतिम टप्प्यात असून याबाबत शासन निर्णय झाला असून शेतकरी सभासदाचा सातबारा लवकरच कोरा होणार आहे.

सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी दि.२७ सप्टेंबर रोजी सोसायटीच्या प्रांगणात आयोजित ६८ व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत अध्यक्षीय समारोप करताना केले. ते पुढे म्हणाले की, सोसायटीचा पदभार स्वीकारून दिड वर्ष झाले. शेतकऱ्यांसाठी या दिड वर्षात पिक विमा मोफत भरण्यात आले तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी जेनेरिक मेडिकल सुरू करण्यात आले. सोसायटीकडून शेतकरी सभासदांच्या शेतीमाल ठेवण्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा गोडाऊन उभारणीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून आगामी काळात तारण कर्ज सेवा ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतीनिष्ठ पुरस्कार सुरू करण्याबरोबरच शेतकरी सभासदाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सोसायटीकडून सुविधा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असून या शासनाकडून सुविधा केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.

सोसायटीचे कामकाज संगणकीकरण करण्यात येणार आहे. तसेच उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीसाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून निवडणुकीत दिलेले उपसा जलसिंचन योजनेची कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच कर्जदार असलेल्या शेतकरी सभासदाचा सातबारा कोरा होणार आहे.असे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी यावेळी दिली.

सभेच्या सुरूवातीस संस्थापक चेअरमन माजी आमदार जयराम अंबेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार टाकुन अभिवादन करण्यात आले. तसेच संस्थेच्या दिवगंत चेअरमन यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.व सोसायटीचे दिवंगत शेतकरी सभासद व खा.वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. ३१ मार्च २०२३ अखेर २५८१ एवढी होती.तर या वर्षात संस्थेच्या सभासद संख्येत १०६ ने वाढ होत ३१ मार्च २०२४ अखेर २६८७ इतकी सभासद संख्या झाली.
यावेळी माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार, संजय पाटील शेळगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास सोसायटीचे माजी चेअरमन सयाराम नरावाड, व्हाईस चेअरमन गंगाधर नरावाड, संचालक प्रकाश अर्जुने, गंगाधरराव खेळगे, हणमलू कोटलावार, गणपत पाटील टेकाळे, चक्रधर पाटील दीडशेरे, संजय गंगोणे, माधवराव पाटील, धुरपतबाई गट्टूवार, प्रसुधाबाई जोगदंड, दत्ता कोमुलवार, मनोहर पाटील रामपुरे, नरेश सब्बनवार, यांच्यासह माजी चेअरमन, माजी संचालक सह सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहवालाचे वाचन मँनेजर रामराव रत्नागिरे यांनी केले.तर प्रास्ताविक संचालक प्रकाश पाटील अर्जुने यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.नरेश बोधनकर यांनी तर आभार प्रदर्शन मँनेजर रामराव रत्नागिरे यांनी केले. वार्षिक सभेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker