कुंडलवाडी ते हरनाळी रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रँक्टर पकडले
◆बिलोली तहसीलच्या पथकाची कारवाई

कुंडलवाडी :- शहरापासून जवळच असलेल्या कुंडलवाडी ते हरनाळी रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रँक्टर बिलोलीचे नायब तहसीलदार बालाजी मिठ्ठेवाड यांच्या पथकाने पकडून जप्त केले आहेत. हि कारवाई दि.२७ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता करण्यात आली. या कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणा-यांत खळबळ उडाली आहे.
बिलोली तालुका मांजरा नदीत असलेल्या लाल वाळूसाठी प्रसिद्ध आहे. कुंडलवाडी परिसरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस अवैध वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे बिलोली तहसीलने उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे.
पथकावर पाळत ठेवत मोठ्या प्रमाणात वाळू माफिया सक्रिय झाले आहेत. दि.२७ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कुंडलवाडी ते हरनाळी रोडवर अवैधरित्या वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक करताना एक विना क्रमांकाचे ट्रँक्टर बिलोलीचे नायब तहसीलदार बालाजी मिठ्ठेवाड, तलाठी संजय पाटील, तलाठी पवन ठकरोड, धनजंय माळेगावकर, संजय पाटील यांच्या पथकाने पकडले. पथकाने ट्रँक्टर जप्त करून कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणुन लावण्यात आले आहेत.
सदरील जप्त केलेल्या ट्रँक्टरवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती बिलोली तहसील कार्यालयाकडून दिली आहे. शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूमाफिया अवैध वाळू वाहतुकीसाठी सक्रिय झाले आहेत. यात लगतच्या तेलंगणा राज्यातील ही वाळूमाफिया रात्रीच्या वेळेस अवैध वाळू वाहतुकीसाठी सक्रिय झाले आहेत.
या धंद्यात राजकीय मंडळीही गुंतली आहेत.नायब तहसीलदार बालाजी मिठ्ठेवाड यांच्या पथकाने पकडलेला ट्रॅक्टर हा कुंडलवाडी शहरातील दिग्गज वाळूमाफियाचा आहे. गत अनेक महिन्यांपासून महसूल विभागाच्या पथकाला चकमा देत सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक करीत होता. शहरातील दिग्गज वाळू माफीयाचा ट्रॅक्टर महसुल विभागाच्या पथकाने पकडल्याने शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.