ताज्या बातम्यानांदेडनायगांव

गडग्याला तीन डीपी मिळाले ; विजेची समस्या लागली मार्गी, उर्वरित ७ डीपीही मिळणार… नायगावच्या उपकार्यकारी अभियंत्याची तत्परता!

New Bharat Times नेटवर्क

नायगाव : नायगाव तालुक्यातील गडगा येथील नादुरुस्त झालेल्या डीपीने कमी दाबामुळे होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर वृत्त प्रकाशित होताच महावितरणचे उप कार्यकारी अभियंता शिवराज भूरे यांनी तातडीने दखल घेत सिंगल फेजचे तीन नवे डीपी उपलब्ध करून दिले. त्यामुळे गुरूवारी अंधारात गेलेले गडगा गाव रविवारी पुन्हा प्रकाशमान झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महावितरणच्या उप अभियंत्यांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही केल्याने समस्या मार्गी लागली.

नायगाव तालुक्यातील गडगा येथे चार ठिकाणच्या एकूण १० सिंगल फेज डीपी नादुरुस्त झाल्याने वीजपुरवठा पूर्णतः ठप्प झाला होता. कमी दाबामुळे वीज येत नसल्याने घरगुती वीजपुरवठा अनिश्चित झाला होता. या गंभीर परिस्थितीबाबत ठळकपणे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महावितरणची यंत्रणा हलली.
बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गडगा गावांसाठी तातडीने तीन सिंगल फेज डीपी उपलब्ध करून दिले.

मस्जिद जवळील दोन लोखंडी खांब बसविण्यात आले. त्यामुळे तेली डीपी, महादेव डीपीवरचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. समस्या मार्गी लावल्याबद्दल गावकऱ्यांनी आभार मानले असून उर्वरित नादुरुस्त डीपी लवकरात लवकर दुरुस्त करून संपूर्ण गावाला स्थिर वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.उर्वरित सात डीपी नादुरुस्त असल्याने त्या लवकरच मिळतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बातम्यामुळे यंत्रणा हलली आणि गडग्याला दिलासा मिळाला हीच या वृत्ताची सकारात्मक फलश्रुती ठरली आहे.विजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी नायगावचे उपकार्यकारी अभियंता शिवराज भूरे, मांजरमचे कनिष्ठ अभियंता वाकळे, वीज तंत्रज्ञ स्वामी, ढगे, ऑपरेटर अशोक कोरे यांनी प्रयत्न केले.

धोकादायक असलेले विजेचे खांब बदलले…
जून्या गावातील मस्जिद समोर असलेला एक खांब जीर्ण होऊन शनिवारी जमीनीवर आडवा पडला होता.ही बाब उप अभियंता भूरे यांना कळवताच त्यांनी तातडीने खांब तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देत पडलेला त्याचबरोबरीने धोकादायक बनलेला दुसरा खांब बसविण्याची कार्यवाही पूर्ण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker