ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगावमध्ये मुरुम माफीयांचा धुमाकूळ : तहसीलदारांची बघ्याची भुमिका

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : कुठलीच परवानगी नसताना मागच्या आठ दिवसापासून नायगाव तालुक्यात मुरुमाचे अवैध उत्खनन करुन वाहतूक करण्यात येत आहे. तहसीलदारांच्या मुक समंतीने तालुक्यात मुरुम माफीयांनी धुमाकूळ घातला असून दररोज शासनाला दररोज लाखो रुपयाचा चुना लावण्याचे काम संगणमताने होत आहे. त्यामुळे नायगाव तालुक्याला सक्षम तहसीलदारांची गरज असल्याचे बोलल्या जात आहे.

तालुक्यात अवैध रित्या चालणार्या रेती माफिया ची टोळीत वाढ तर कुठे होते नैसर्गिक सौंदर्य असणार्या माळाची पोखरून मुरमाची रात्रीच्या अंधारात विक्री महसूल बुडवत विभागाला ठेवतात अंधारात अवैध रित्या चालणार्या गौरख धंदा कोणाच्या मार्गदर्शनाखाली कोण घालते खत पाणी तर तालुक्यात चालणार्या माफियाला पाठिंबा तलाठी सह मंडळ अधिकारी असणारे पाहरेकरी कोणाच्या समर्थनात कोणाची भरतात खळगी महसुलात पडते भर की रात्री चोरी करून खिशात पडते भर मात्र अस्पष्ट याला पाठराखण कोणाचा तहसीलदाराकडून कारवाई ऐवजी समर्थन का …?

शेजारच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करून नायगाव तालुक्यात विक्रीकरून रात्रीतुन आपले रान मोकळे केले जाते तर आपल्या चोरी थांबण्यासाठी साठी खाकी कडे हक्कने आदराने व न्यायाणे पाहिले जाते तर तीच खाकी रात्री पहारा देते पण रात्रीची चोरी उघड्या डोळ्यांनी दिसत जरी असली तरी बंद का करते हे सर्व लपवण्याची मोबदला मिळत असावा म्हणून चौरी करण्यासाठी राण मोकळे सोडले जाते असे जनतेतून ठासून ऐकू पण येते पण बोलल्या पण जाते

नायगाव तालुक्यातून मुरुमाचे उत्खनन करण्यासाठी कुणालाही परवानगी दिली नाही तरीही मागच्या चार पाच दिवसापासून दिवसरात्र मुरुमाचे उत्खनन करुन वाहतूक केली जात आहे. अवैध मुरुमाचे उत्खनन करणारे तहसीलदारांच्या गुडबुकमधील असल्याने त्यांना रान मोकळे सोडण्यात आले असल्याची चर्चा महसूल विभागातच होत आहे.

नायगाव शहरात सुट्टीच्या दिवशीही टिप्परने अवैध मुरूम वाहतूक चालू. शहरातील अवैध मुरूम रेती वाहतुकीमुळे शहरातील अरुंद रस्त्यावरून ट्राफिक जामची समस्या निर्माण होत आहे. मागील चार पाच दिवसापासून अखंडपणे महसूल, पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून मुरुमाचे उत्खनन करून शहरातून वाहतूक सुरूच असून ती सुट्टीच्या दिवशीही चालूच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker