ताज्या बातम्यानांदेडबिलोली

डौर फाटा येथे अवैध वाळू वाहतुकीचा टेम्पो पकडला ◆आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कुंडलवाडी :- शहरापासून जवळच असलेल्या डौर फाटा येथे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नेमलेल्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टेम्पो पकडून ४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई दि.२४ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता करण्यात आली.या कारवाईने अवैध वाळू वाहतूक व उत्खनन करण्याचे धाबे दणाणले आहे.

कुंडलवाडी शहर व परिसरात महसूल व पोलीस प्रशासनाच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने रात्रभर अवैध वाळू उत्खनन व वाळूची चोरटी वाहतूक होत आहे.नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नेमलेल्या पथकातील पोहेकाँ मुदीराज,पोहेकाँ तलवारे यांनी दि.२४ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता डौर फाटा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे टेम्पो क्रमांक एम एच १९ झेड ६५०० यास पकडून ४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी रवी देशमुख यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख गौस पाशा शेख उस्मान पाशा (रा.धर्माबाद) याच्या विरुद्ध कलम २०३(२)भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ४८(७)४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ शंकर चव्हाण हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker