राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडून विधान सभेसाठी विनायक पाटील शिंदे यांच्या नावाची चर्चा…

सौ.मीना भद्रे
धर्माबाद :- आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांनी देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील, राज्याचे माजी मंत्री आ.राजेश टोपे यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात नुकतीच भेट घेऊन नायगांव विधानसभा मतदार संघातून पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आणि पक्ष श्रेष्ठींकडे आपल्या कामाचा अहवाल सादर केला आहे.
नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा हुस्सा येथील रहिवासी विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांनी नायगाव तालुक्यातून २००७ मध्ये जि.प.लढवली तसेच २००५ ते २०१० या कालावधीत नायगाव तालुका सरपंच संघटना अध्यक्ष म्हणून कार्यरत होते
एक संस्था चालक हुस्सा गावचे माजी सरपंच असणारे विनायक शिंदे यांनी नायगाव मतदार संघात असेलल्या उमरी, धर्माबाद व नायगांव या तिन्ही तालुक्यात व विविध कार्यक्रमात अग्रेसर राहून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत पक्षनिष्ठे ने काम केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरोगामी विचारसरणीचा कायम पगडा त्यांच्या राजकीय वाटचालीवर राहीलेला असल्यामुळे पक्षाने निष्ठावंताना संधी दिल्यास आपण पूर्ण ताकदीनिशी नायगांव विधानसभा लढवू असे त्यांनी सांगितले.
विनायक पाटील शिंदे यांच्या सारख्या पक्षनिष्ठ सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिल्यास नक्कीच मतदार संघात परिवर्तन घडणार आहे ते ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांना सर्व समस्यांची जाणीव आहे तसेच ते जनतेच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी पूर्णवेळ उपलब्ध असतात शांत स्वभाव आणि मोठा जन संपर्क असलेल्या विनायक पाटील शिंदे यांच्या सारख्या सर्व समावेशक नेतृत्वाला संधी मिळालीच पाहिजे अशी मागणी मतदार संघात होत आहे.