ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव मतदारसंघात 3 लाख 8 हजार मतदार : पहील्यांदाच 10 तृतीयपंथी करणार मतदान

निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांची माहिती

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव विधानसभा मतदारसंघात ३ लाख ८ हजार ८२८ मतदार असून यात ४८.७९ महिल तर ५१.२० पुरुष मतदार आहेत. दिव्यांग मतदार ३०४८ तर जेष्ठ मतदार ८५ वर्षापेक्षा जास्त वयाचे ३६०७ मतदार असून. पहील्यांदाच १० तृतीयपंथी मतदान करणार आहेत. स्थिर पथकासह फिरते पथक आणि निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली असून. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी केले आहे.

नायगाव मतदारसंघातील निवडणुकीची माहिती देण्यासाठी स्वाती दाभाडे यांनी बुधवारी नायगाव तहसील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ८९ नायगाव मतदारसंघासह नांदेड-१६ लोकसभा पोट निवडणुकीची माहिती दिली. नायगाव विधानभेची व लोकसभेची पोट निवडणूक एकत्रच होणार असल्याने मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना एकवेळ दोन मतदान करावे लागणार आहे. तीन तालुक्याचा समावेश असलेल्या मतदारसंघात नायगाव तालुक्यात १४९९६९, उमरी तालुका ८२००९ आणि धर्माबाद तालुका ७६८५० असे ३ लाख ८ हजार ८२८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदारसंघात ३५० मतदान केंद्र असून नायगाव १७१, उमरी ९२ तर धर्माबाद ८७ आहेत. ज्या मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जाता येत नाही अशांना घरुनच मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी बी एल ओ कडे १२ डि फार्म देण्यात आला आहे ते मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडण्यासाठी वर्ग २ दर्जाचे नोडल अधिकारी नेमण्यात आले असून एकूण २६ कक्ष असून २२ नोडल अधिकारी आणि ए आर ओ दर्जाचे ३ नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परवाना कक्ष, राजकीय पक्ष,उमेदवार खर्च तपासणी कक्ष आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्थेसाठी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यात नायब तहसीलदार परमानंद गावंडे, बंडेवार व्हि. जी उपकोषागार अधिकारी, गटविकास अधिकारी एल.आर. वाजे व नगरपंचायत नायगावच्या मुख्याधिकारी गंधाली पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदर्श आचारसंहितेचे कडेकोट पालन होण्यासाठी आणि निवडणुकीत असामाजिक लोकाकडून मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वाहतूकीवर निर्बंध आणण्यासाठी मतदारसंघांच्या सिमेवर म्हणजे कहाळा, नरसी, सिंधी, हुंडा तांडा, बेल्लूर बु, बन्नाळी, बासर रोड व शेळगाव थडी येथे स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आली आहेत.

निवडणुकीत राजकीय पक्ष व उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्यात तीन फिरते पथक स्थापन करण्यात आले आहेत.

लोकसभा पोट निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातून हाताळण्यात येत असून लोकसभा व विधानसभेसाठी मतदान एकच वेळी, एकाच दिवशी व एकाच मतदान केंद्रावर पार पडणार असल्याचे स्वाती दाभाडे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker