राजेश कुंटूरकरांना लोकसभा पोट निवडणकीच्या उमेदवारीसाठी शिफारस करा : शिष्टमंडळाची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे मागणी

प्रकाश महिपाळे
कुंटूर : नांदेड लोकसभा पोट निवडणुकीच्या संदर्भात राजेश कुंटूरकर साहेबांच असंख्य समर्थकांच शिष्टमंडळाने आज नांदेड येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार मा. अशोकराव चव्हाण साहेब यांची त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मा.अशोकराव चव्हाण साहेबांना सर्व समर्थकांनी नांदेड लोकसभा पोट निवडणूकीची उमेदवारी राजेश कुंटूरकर साहेबांना देण्यासाठी आपण केंद्रीय समितीकडे शिफारस करावी असं मत कुंटूरकर समर्थकांनी अशोकराव चव्हाण याच्या समोर मांडले आहे.

या भेटीत सर्व सामान्य जनतेच्या मनातला माणूस राजेश कुंटूरकर आहेत. कुंटूरकर साहेबांनी आम्हाला तुमच्या भेटीला जा , भेट घ्या म्हणून पाठवले नाहीत तर आम्ही सर्व कार्यकर्ते मिळुन त्यांच्यासाठी आमच्या मनात असलेली तळमळ आणि तळागाळातील माणसाच्या मनात कुंटूरकर साहेबां विषयी असलेला जनाधार हे आपल्या समोर व्यक्त करावं म्हणून आम्ही तुमच्या भेटीला आलो आहोत असे मत यावेळी कुंटूरकर साहेबांचे असंख्य समर्थकांनी व्यक्त केले आहेत. कुंटूरकर साहेबांच्या समर्थकांची मत जाणून घेतल्या नंतर माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार मा.अशोकराव चव्हाण साहेबांनी बोलताना असे म्हंटले मी भाजपा पक्षात नविन आहे.
माझ्या आगोदर कुंटूरकर साहेबांनी भाजपा पक्षात आले आहेत. तुम्ही जुने आहोत माझ्या माहिती नुसार जनतेनी राजेश कुंटूरकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी जिवाची पराकाष्ठा करत आहेत. हे मी जाणुन आहे. असे म्हणत स्व. शंकरराव चव्हाण साहेब व स्व. गंगाधरराव कुंटूरकर साहेब यांनी दोघे मिळून नांदेड जिल्ह्यातील राजकारण केले आहेत आणि नांदेड जिल्ह्यात एकमेकांना समजून घेऊन वेळप्रसंगी एकमेकांना सहकार्य करण्याचे काम केले आहेत.
त्यामुळे मी स्वतः नांदेड लोकसभा पोट निवडणूकीच्या उमेदवारीसाठी राजेश कुंटूरकर यांच्यासाठी मी आग्रही भूमिका घेतली आहे. आणि तशी माहिती पक्षश्रेष्ठींकडे दिली असून आजही तीच भूमिका माझी आहे. राजेश कुंटूरकर नवतरुण आहेत त्यांना भविष्य आहे. अस म्हणत चव्हाण साहेब यांनी सूचक इशारा देत, राजेश कुंटूरकर यांच्या उमेदवारीला माझा होकार आहे.
जर, राजेश कुंटूरवर यांना पक्षाने उमेदवारी दिली तर मला खूप आनंद होईल आणि सर्वात अगोदर मी प्रचाराला निघेल अशी ग्वाही अशोकराव चव्हाण साहेबांनी दिली. माझे आणि कुंटूरकर परिवाराचे खूप जवळीक संबंध आहेत. मागील 10-15 दिवसांत राजेश कुंटूरकर यांचे नाव नांदेड लोकसभा इच्छुक उमेदवार म्हणून समोर आले आहे. राजेश कुंटूरकर यांच्या नावाची चर्चा आजही पक्षश्रेष्ठींकडे चालू आहे. उमेदवारी बाबत भाजप केंद्रीय पक्षश्रेष्ठीची अजुनही चर्चा सुरू आहे. लवकरच चर्चा होऊन उमेदवारी घोषित होईल.असे म्हणत राजकारण करत असताना आमच्यात कमी जास्त झाले आहे.
ते मी स्वतः मान्य करतो आणि मागचे सर्व विसरून नव्याने राजकारणाला सुरुवात केली असून तुम्हाला आमच्या पाठीशी राहून संपूर्ण नांदेड लोकसभा क्षेत्रात काम करावं लागेल तरच हे शक्य होईल. नांदेड लोकसभेची जागा खुप महत्त्वाची आहे. ही जागा कशी निवडुन आणता येइल यासाठी तुम्हाला तत्परतेने काम करावे लागेल आणि ही जागा आपल्याकडे खेचुन आणावी लागेल यासाठी तुम्ही कामाला लागा येत्या दोन दिवसात उमेदवारी जाहीर होईल.असे म्हणत राजेश कुंटूरकर यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे मी स्वतः केली आहे.
आणि तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका ठेऊ नका. स्व. शंकरराव चव्हाण साहेबां पासून ते आजपर्यंत चव्हाण कुटुंबाने एकदा शब्द दिला तर तो पाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आणि आजही मी राजेश कुंटूरकरसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारच असा शब्द अशोकराव चव्हाण यांनी कुंटूरकर समर्थकांना दिले आहे.