ताज्या बातम्यानांदेडनायगांव

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार महिलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – बालाजी बच्चेवार

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत योजना बरगळी असल्याची अफवा पसरली आहे त्यामुळे चलबिचल वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी ही योजना सुरुच राहणार असून महिलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे.

ही सुरुळीत सुरु असताना विरोधक या योजनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्याबरोबरच राज्य सरकारची ही योजना बारगळली असल्याचीही अफवा पसरवत आहेत. महायुतीच्या सरकारची ही महिला सबलीकरणाची योजना बंद पडणार नसून ती सुरुच राहणार असून. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे. या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला किंवा आफवांना महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये किंवा अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन भाजपचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker