ताज्या बातम्यानांदेडनायगांव

महायुतीमध्ये घटक पक्षाकडून बंडखोरीची शक्यता : रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे नायगाव विधानसभा लढवणार

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : भाजपा महायुती सोबत गेल्या वर्षापासून शेतकरी नेते आ.सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना काम करत आहेत. असे असताना रयतचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नायगाव विधानसभा लढवणार असून त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षाकडूनच बंडखोरीची शक्यता असल्याने विद्यमान आमदार राजेश पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलल्या जात आहे.

नायगाव विधानसभा मतदारसंघातून राजेश पवार यांना पक्षाने पुन्हा संधी दिली असल्याने त्यांची यंत्रणा मतदारसंघात कामाला लागली असली तरी त्यांचे घटक पक्षाबरोबरचे त्यांचे संबध चांगले राहीले नाहीत. त्यामुळे घटक पक्ष त्यांच्यावर नाराज आहेत परिणामी रयत संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. कारण त्यांना आमदारांच्या एकाधिकारशाहीला शह द्यायचा असून ते नायगाव मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न घेवून वातावरण निर्मिती करत आहेत.

महायुतीकडून नायगाव विधानसभेसाठी विद्यमान आमदार राजेश पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पण रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी आज गुरुवारी नायगाव तहसील कार्यालय विधानसभेचे दोन अर्ज खरेदी केली आहेत. पांडुरंग शिंदे यांनी जर विधानसभेसाठी अर्ज भरला तर महायुतीमध्ये घटक पक्षाकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे? रयत क्रांती संघटना आणि शेतकऱ्याची ताकत पांडुरंग शिंदे यांच्यामागे उभी राहिली तर निश्चितच महायुतीचे उमेदवार राजेश पवार यांना ही निवडणूक जड जाईल असे जाणकाराचे मत आहे.

नायगाव मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर व युवा मित्रांशी आणि आमचे नेते आदरणीय सदाभाऊ खोत यांच्याशी विचारविनिमय करून विधानसभेचे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल.
-पांडूरंग शिंदे रयत क्रांती संघटना (युवा)

८९ नायगाव विधानसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे (ता.२४) पर्यंत ४८ उमेदवारांनी ८४ उमेदवारी अर्ज खरेदी केले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker